बांधकामासाठी ऑनलाइन परवानगी देणारी अचलपूर नगरपालिका राज्यात प्रथम

बांधकामासाठी ऑनलाइन परवानगी देणारी अचलपूर नगरपालिका राज्यात प्रथम
Updated on

परतवाडा (जि. अमरावती) : महाराष्ट्र शासनाच्या नव्या बीपीएसएम प्रणालीवर आता विकासकामाच्या बांधकामासाठी ऑनलाइन परवानगी दिली (Online permission for construction) जाणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना बांधकाम परवानगी मिळणे सोपे व सोयीचे होणार (It will be convenient to get building permission) आहे. ऑनलाइन बांधकाम परवानगी देणाऱ्या अचलपूर नगरपालिकेने राज्यात प्रथम (Achalpur Municipality is the first in the state) नगरपालिका होण्याचा बहुमान मिळविला आहे. (Online-permission-for-construction-now)

नगरपालिका क्षेत्रातील इमारत व अन्य विकासकामांच्या बांधकाम परवानगीसाठी असलेल्या जटिल प्रणालीला शासनाने नागरिकांच्या सोयीकरिता ऑनलाइन बीपीएसएम प्रणाली अपडेट केलेली आहे. एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली शासनाने प्रसिद्ध केलेल्या डिसेंबर २०२० च्या अंतर्गत परवानगी देण्यासाठी ऑनलाइन बीपीएसएम अपडेट करण्यात आलेली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिक आदींना बांधकाम परवानगी मिळणार आहे.

बांधकामासाठी ऑनलाइन परवानगी देणारी अचलपूर नगरपालिका राज्यात प्रथम
दिलासा : पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न, लक्ष्यवेधी नाही

शासनाच्या बीपीएसएम प्रणालीवर ऑनलाइन इमारत बांधकाम परवानगी देणाऱ्या अचलपूर नगरपालिकेला राज्यात प्रथम नगरपालिका होण्याचा बहुमान मिळाला असल्याचे सहायक रचनाकार मृणालिनी पाटील यांनी सांगितले. मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या मार्गदर्शनात सहायक रचनाकार मृणालिनी पाटील, रचना सहायक शिवम देशमुख, सोमेश धड यांनी काम पार पाडले असल्याचे नगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ऑनलाइन अर्ज सादर करा

मारत आदी विकासकामांसाठी नागरिकांनी या ऑनलाइन प्रणालीच्या आधारे ऑनलाइन अर्ज सादर करावे, असे आवाहन नगराध्यक्ष सुनीता फिस्के व मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी केले आहे.

(Online-permission-for-construction-now)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.