राजुरा (जि.चंद्रपूर) : राज्यातील आदिवासी विकास विभागात 2018 रोजी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कंत्राटी क्रीडा, कला आणि संगणक शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्यावर्षी 502, तर दुसऱ्यावर्षी एक हजाराच्या आसपास क्रीडा, कला आणि संगणक शिक्षकांच्या नेमणुका सरकारने कंत्राटी पद्धतीने केल्या. करार संपताच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येते. मात्र, यंदा लॉकडाऊनचे कारण समोर दीड हजार कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीच्या आदेशासोबतच मानधन देण्यात आले नाही. मानधन मिळाले नसल्याने या कंत्राटी शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या 502 शासकीय आश्रमशाळा आहेत. राज्यात ठाणे, नाशिक, अमरावती आणी नागपूर असे चार विभाग आहेत. या प्रत्येक विभागात सहा ते आठ प्रकल्प आहेत. प्रत्येक प्रकल्पात 120 ते 150 शासकीय शाळा आहेत. प्रत्येक शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत 400 ते 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आदिवासी विभागाने सहा मार्च 2018 च्या परिपत्रकानुसारनुसार क्रीडा, कला आणी संगणक शिक्षकांची भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्यावर्षी क्रीडा शिक्षकांची भरती करण्यात आली. त्यानंतर 2020 रोजी कला आणि संगणक शिक्षकांची भरती करण्यात आली. क्रीडा, कला आणि संगणक शिक्षकांच्या नियुक्तीचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला. अकरा महिन्यांच्या करारावर या कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्ता करण्यात आल्या. मात्र, लॉकडाऊनपासून या कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीच्या आदेशासोबतच मानधनही मिळाले नाही.
कलागुण अवगत शिक्षकांच्या नियुक्त्या आदिवासी विभागाने का थांबवल्या, असा संतप्त सवाल शिक्षकांनी केला आहे. लवकरात लवकर आदिवासी खात्यातील क्रीडा, कला आणि संगणक शिक्षकांना नियुक्तीचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी या शिक्षकांनी आदिवासी विकासमंत्र्यांकडे केली आहे.
शासनाने क्रीडा, कला व संगणक शिक्षकांची नियुक्ती पूर्वपदावर करावी. मागील सहा महिन्यांपासून कुठलेही मानधन नसल्यामुळे शिक्षकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे आम्ही आर्थिक संकटात आहोत . आम्हाला पूर्वपदावर नियुक्त करून नियमित वेतन देण्यात यावे, शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
पूर्वा खेरकर,
क्रीडा शिक्षक राजुरा.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.