तिवसा : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यासह तालुका सीमेवर प्रशासनाकडून चेकपोस्ट मार्फत वाहनाची कसून चौकशी करण्यात येत आहे. तिवसा मतदार संघातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चेकपोस्टवर मंगळवारी (ता.५) दुपारी एका वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पाच किलोपेक्षा अधिक सोने व चांदी आढळून आले असल्याची माहिती पी. आय. शिरस्कर यांनी दिली.