परतवाडा आरोग्य विभागच आजारी तर जनता किती सुरक्षित, प्रशासन आता तरी लक्ष देणार का?

paratwada health department is in dangerous situation in amravati
paratwada health department is in dangerous situation in amravati
Updated on

परतवाडा (जि. अमरावती) : शासकीय आरोग्यकेंद्रात नेमण्यात आलेले काही अधिकारी रुग्णालयात पूर्णवेळ उपस्थित नसल्याने तेथे उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांचे हाल होत असल्याची ओरड होत आहे. वरिष्ठांनी आरोग्य विभागाकडे तातडीने लक्ष देऊन चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी रुग्णांनी केली आहे. 

राज्यामध्ये कोरोना आजाराची धग शहरासोबतच ग्रामीण भागात आजही कायम आहे. दुसरीकडे वातावरण बदलामुळे संसर्गजन्य आजार वाढले आहेत. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात जात आहे. मात्र, तालुक्‍यातील अनेक आरोग्यकेंद्रांत नेमण्यात आलेले काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नाही. त्यामुळे रुग्णांना इतरत्र खासगी रुग्णालयात महागडे उपचार करावे लागत असल्याची ओरड आहे. रुग्णांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. आता तरी वरिष्ठांनी तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आरोग्यकेंद्रात येणाऱ्या ग्रामीण रुग्णांकडून पुढे येत आहे. यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. 

याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन याची चौकशी करावी. तसेच दोषींवर कारवाई करावी. यासंदर्भात पंचायत समितीच्या सभेत चर्चा करणार आहे. 
- श्रीधर काळे, उपसभापती, पं. स. अचलपूर. 

आरोग्यकेंद्रात अधिकारी व कर्मचारी पूर्णवेळ देत नाहीत. तालुका वैद्यकीय अधिकारीही कार्यालयात नसल्याच्या तक्रारी आहेत. आता मंत्रालयात जाऊन आरोग्यमंत्र्यांकडे यासंदर्भात तक्रार करणार आहे. 
-बंडू घोम, तालुकाध्यक्ष शिवसेना. 

यासंदर्भात मुख्य कार्यपालन अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत चौकशी करून तातडीने कारवाई करण्यासंदर्भात मागणी करण्यात येणार आहे. 
- श्‍याम मसराम, जिल्हा परिषद सदस्य.  

काही अधिकारी रुग्णालयात पूर्ण वेळ उपस्थित नसल्याबाबत तक्रार आल्यास चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. 
-डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य वैद्यकीय अधिकारी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.