भंडारा : डॉक्टरने प्राथमिक आरोग्य केंद्रातील (Primary Health Center) शिपायाला गळा आवळून काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कडस्कर, असे या मारहाण करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. ते गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर आहेत. मारहाण झालेल्या शिपायाचे नाव नारायण उइके आहे. एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये डॉ. कडस्कर हे शिपायाला आधी काठीने मारहाण करताना दिसतात. त्यानंतर त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून गळा आवळताना दिसतात. हा व्हिडिओ आरोग्य केंद्रातील एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिपाई कामावर वेळेत येत नसल्यानं ही मारहाण केल्याचे समजते. पण, मारहाणीचा व्हिडिओ पाहून हे डॉक्टर आहेत की आणखी कोण? असा प्रश्न भंडारावासियांना पडला आहे.
डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल -
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आदिवासी संघटना डॉक्टर विरोधात एकवटल्या आहेत. डॉक्टरला निलंबित करण्याची मागणी करत आहेत. डॉक्टरविरोधात संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गोबरवाही पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. कर्मचारी कर्तव्यावर येत नसल्यानं कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, डॉक्टरांनी स्वतः कायदा हातात घेतल्याने हे प्रकरण त्यांच्या अंगलट येणार हे नक्की. याबाबत आम्ही डॉक्टरची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.