कोणी तोडले रुग्णालयाचे दार तर कोणी खुर्च्या.. 'त्या' प्रकारानंतर अमरावतीकरांचा संताप अनावर.. वाचा सविस्तर..

people in Amravati did Vandalism in Modi Hospital read full story
people in Amravati did Vandalism in Modi Hospital read full story
Updated on

 अमरावती: शहरातील बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील एका व्यापार संकुलात एक व्यक्ती चार दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या युवतीसह इतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करण्यासाठी बडनेरा हद्दीतील एका कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये बोलविले होते. मात्र त्याचवेळी या युवतीसोबत एक संतापजनक प्रकार घडल्याची घटना पुढे आली होती. मात्र आता या  धक्कादायक प्रकरणानंतर अमरावतीकर चांगलेच संतापले आहेत.

२४ वर्षीय कोरोना संशयित मुलीची कोरोना चाचणी करताना तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीच्या मोदी रुग्णालयात उघडकीस आला होता. त्यानंतर आता या प्रकरणाच्या विरोधात संपूर्ण अमरावतीकर पेटून उठले आहेत.  

काय आहे प्रकरण

महिला अधिकाऱ्यांसोबत चाचणीसाठी युवती लॅबमध्ये गेली. यावेळी युवतीसह इतरांचा स्वॅब घेण्यात आला. त्यानंतर स्वॅब घेणारा लॅब टेक्‍निशियन अलकेश अशोक देशमुख (वय 25, रा. पुसदा) याने संबंधित युवतीस "तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे' असे सांगितले. शिवाय दुसरी युरिनल चाचणी करावी लागेल, असे सांगून तिला थांबवून ठेवले. युवतीला अलकेशच्या वर्तणुकीवर शंका आली. तिने आपल्या भावाला घटनाक्रम सांगितला. युवतीच्या भावाने जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन स्वॅब टेस्ट नंतर कोरोना चाचणीसाठी युवतीले दिलेल्या टेस्टबाबत चौकशी केली असता स्वॅब व्यतिरिक्त दुसरी कोणतीही चाचणी त्यासाठी करावी लागत नाही, असे डॉक्‍टरांनी सांगितले. चाचणी घेणाऱ्या अलकेशने युवतीचा मोबाईल क्रमांक घेतला अन्‌ तिला थोड्या वेळाने "तू खूप सुंदर दिसते, माझ्याशी मैत्री करशील काय?' असा मेसेजही पाठविला. युवतीच्या लॅबटेक्‍निशियनचा उद्देश लक्षात आला. तिने बडनेरा ठाण्यात तक्रार नोंदविली. 

बडनेराच्या मोदी रुग्णालयाची तोडफोड

बडनेराच्या ज्या हॉस्पिटलमध्ये मुलीचा चुकीच्या पद्धतीने स्वब घेण्यात आला होता त्या मोदी हॉस्पिटलची आज काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून आपला संताप व्यक्त केला. यावेळी रुग्णालयाची दारे, खुर्च्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी आता पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अमरावतीत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.