भिंत खचली, चूल विझली! आता डोळ्यांमध्ये पूर

flood
flood
Updated on

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : गोसेखुर्दच्या पाण्यामुळे आलेल्या पुराचा ब्रह्मपुरी तालुक्‍याला जबर फटका बसला. बेलगाव आणि लाडज ही गावे सर्वाधिक प्रभावित झाली. पूर ओसरला. मात्र खुणा कायम आहे. या दोन्ही गावातील कुटुंब उद्‌ध्वस्त झाली आहे. पुराच्या पाण्याने एका क्षणात सर्वच होत्याचे नव्हते झाले. चहू बाजूंनी पाण्याचा वेढा असताना आता पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी धावाधाव सुरू आहे.

पाच दिवसानंतर बेलगाव, लाडज गावातील पाण्याचा वेढा ओसरला.जगण्याची आस घेऊन गावकरी घराकडे परतले. पाच दिवसांपूर्वी गजबजलेल्या गावाचे अक्षरशः: कचराकुंडीत रूपांतर झाल्याचे बघून डोळ्यांत अश्रूंचा पूर आला. घरात घुसलेला केरकचरा, माती, घाण काढणे आणि बऱ्या स्थितीत असलेल्या वस्तू शोधण्याची धडपड सुरू होती. मात्र माती आणि चिखलाशिवाय गावकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. एकीकडे निवारा कोसळला दुसरीकडे पोटाची भाकरी देणारी काळी आईही पुराची बळी ठरली. शेतशिवारात पाणी साचले आहे. धान पाण्याखाली आल्याने सडत आहे.

जनावरांची चाऱ्यासाठी ससेहोलपट सुरू आहे. मागील पाच दिवसांपासून बहुतांश जनावरे चाऱ्याशिवाय जगत आहेत. त्यांच्याही अंगात आता बळ उरले नाही. पुरग्रस्त गावातील जनावरे, कोंबडया वाहून गेल्या. खुराटे रिकामी पडली आहे. माणसांसोबतच जनावरांनाही औषधोपचाराची गरज आहे.

साठवलेले धान्य रस्त्यावर
या दोन्ही गावांना नेहमीच पुराचा फटका बसतो. त्यामुळे गावाचा संपर्क तुटतो. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वर्षभर पुरेल इतके धान्य साठवून ठेवले जाते. यावेळी देखील धान्याची जुळवाजुळव केली होती. परंतु महापुराने सर्व अंदाज मोडीत काढले. पुराची तीव्रता अधिक होती. त्यामुळे पाणी घरात घुसले आणि अन्नधान्य वाहून गेले. त्यामुळे आता वर्षभर जगायचे कसे? असा प्रश्‍न गावकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

साथीच्या आजाराचा धोका
तालुक्‍यातील काही गावात तीन-चार दिवस पाण्याचा वेढा होता. आता पुराचे पाणी ओसरले आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येते आहे. मात्र चिखल, दलदल आणि दुर्गंधी पसरली आहे. पाळीव जनावरांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतदेह कुजून आता दुर्गंधी पसरली आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा सर्तक आहे. परंतु पुराच्या खुणा आणखी आठ ते दहा दिवस राहण्याची शक्‍यता आहे. या काळात साथीच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही पसरली आहे.

पुराने शेताचे वाळवंट केले
ब्रह्मपुरी ता. गोसेखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी ३३ दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आला. या पुराचा ब्रह्मपुरी तालुक्‍यातील अनेक गावांना फटका बसला. आता पूर ओसरला. मात्र हजारो हेक्‍टर शेतात पुरा सोबत वाहून आलेली वाळू साचली आहे. या शेतशिवारांचे अक्षरश: वाळवंट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतजमीन नापिक होण्याची भीती सतावते आहे. सोबतच शेतातील मोटरपंप, वीजमीटर सुद्धा पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सविस्तर वाचा - ते दोन अविस्मरणीय पावसाळी दिवस

ब्रह्मपुरी तालुक्‍यातील बेलगाव, कोलारी, अऱ्हेर नवरगाव, भालेश्वर, चिखलगाव, पिंपळगाव(भो), लाडज, हरदोली, चिंचोली, सोनेगाव, सोंद्री, सावलगाव, बेटाळा, बोळेगाव, जुगनाळा, मांगली, बेलपातळी, किन्ही, रणमोचन, खरकाडा, निलज, रुई, पाचगाव, बरडकिन्ही, चिचगाव, हळदा, आवळगाव या गावात पुराचे पाणी घुसले. शेतजमीन पाण्याखाली आल्याने पूर्ण पीक उद्‌ध्वस्त झाले. आहे.आता पाणी ओसरल्यानंतर केवळ वाळू बघायला मिळत आहे. मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. नदीकाठावरील त्यांच्या नावा वाहून गेल्या आहेतध.

संपादन - स्वाती हुद्दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.