अमरावती : हिंदूस्मशानभूमीत (Hindu crematorium) अंत्यसंस्कारासाठी लावण्यात येणाऱ्या तिसऱ्या विद्युत दाहिनीला स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून परिसरातील काही महिला व पुरुषांनी आज हिंदू स्मशानभूमीत ठेवण्यात आलेली गॅस दाहिनीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. (people tried to damage Electric crematorium in Amravati)
दाहिनीचे काही साहित्य नजीकच्या नाल्यात फेकण्यात आले. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली. या प्रकारानंतर राजापेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. भाजप तसेच मनसेचे कार्यकर्ते सुद्धा स्मशानभूमित दाखल झाले होते
हिंदू स्मशान भुमितील गॅस दाहिनीमध्ये कोविड मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यासाठी आधीच तेथे दोन गॅस दाहिन्या आहेत, मात्र सततच्या अंत्यसंस्कारामुळे या दाहिन्यांवर ताण पडत आहे, त्यामुळे येथे देणगीतून प्राप्त झालेली तिसरी गॅस दाहिनी लावण्याचे प्रयत्न संस्थेकडून सुरू करण्यात आले आहे. मात्र या परिसरातील वातावरण दूषित होत असून आरोग्याला धोका निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत नागरिकांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यासाठी आतापर्यंत आंदोलने करून नागरिकांनी प्रशासनाला निवेदने सुद्धा सादर केली.
दरम्यान, शुक्रवारी दुपारच्यावेळी परिसरातील नागरिकांनी स्मशानभूमीत जाऊन तेथे ठेवण्यात आलेल्या दाहिनीवर कुदळी व फावडे मारण्यास सुरूवात केली. तसेच काहींनी दाहिनीचे साहित्य बाहेर आणून ते नाल्यात सुद्धा फेकले. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली. यावेळी मनसेचे पप्पू पाटील, संतोष बद्रे, धीरज तायडे, हर्षल ठाकरे, सोमल भुतडा, अमर महाजन, शिवराय कुळकर्णी, नगरसेवक प्रणीत सोनी, स्वाती कुलकर्णी, नीलेश शर्मा, संगीता मडावी, पवन लेंडे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
(people tried to damage Electric crematorium in Amravati)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.