गडचिरोली शहराचे वैभव जपण्यात लोकप्रतिनिधी अपयशी

गडचिरोली शहराचे वैभव जपण्यात लोकप्रतिनिधी अपयशी
Updated on
Summary

शहराच्या मध्यभागी असलेला तलाव त्या शहराचे वैभव असतो; परंतु आता तलाव परिसराकडे कुणी फिरकत नाही, हेच या शहराचे दुर्दैव.

गडचिरोली: जिल्हानिर्मितीनंतर गडचिरोलीचा झपाट्याने विकास झाला. शेतजमिनीवर प्लॉट पडून घरे, वस्त्या निर्माण झाल्या. काहींनी दलदलीच्या जागा माती, मुरूम टाकून बुजवून त्यावर वस्त्या उभारल्या. अनेकांनी गोकुलनगर तलावाकडे मोर्चा वळवला. तलाव परिसरात घर बांधणारा आजूबाजूच्या पाण्यावर मुरूम, माती टाकून जमीन तयार करायचा. मग कुणीतरी येऊन त्यात आणखी भर टाकून डेरा टाकायचा. त्याचे पाहून मग तिसरा बस्तान मांडायचा. असे करता-करता या तलावाची दक्षिण व पूर्व बाजू अतिक्रमणाने गिळंकृत केली. धक्कादायक म्हणजे लोकांनी तलावाचा सांडवासुद्धा सोडला नाही.

गडचिरोली शहराचे वैभव जपण्यात लोकप्रतिनिधी अपयशी
गडचिरोली : पोलिस वाहन चालकाचा मध्यरात्री खून, तपास सुरू

तलावालगत वाहणारा नाला कुठे गडप झाला, कळलेही नाही. सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यापासून तयार नाल्यावर अतिक्रमण आहे. या भयानक प्रकारामुळे गोकुलनगर तलावाची रयाच गेली. शहरात शेतजमिनीही शिल्लक नसल्याने सिंचनाचा प्रश्नच नाही. जिल्हा निर्मितीनंतर येथे नगर परिषद अस्तित्वात येऊन हा तलाव नगर परिषदेच्या हद्दीत आला. त्यामुळे आता विकास जलसंपदा विभागाने करायचा की, नगर परिषदेने ही अडचण आहे. याच संभ्रमावस्थेचा फायदा घेत अतिक्रमण सुरूच राहिले. आता नागरिकच ‘कौन निगल गया ये तलाब’ असे आश्चर्याने विचारत आहेत. शहरातील सांडपाणी याच तलावात टाकले जात असल्याने घाण, दुर्गंधीचे वातावरण आहे. शहराच्या मध्यभागी असलेला तलाव त्या शहराचे वैभव असतो; परंतु आता तलाव परिसराकडे कुणी फिरकत नाही, हेच या शहराचे दुर्दैव.

गडचिरोली शहराचे वैभव जपण्यात लोकप्रतिनिधी अपयशी
गृहमंत्र्यांनी गडचिरोली पोलिसांचे केले कौतुक, म्हणाले आता छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र

गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील तलावाकडे वळलो तसेच उजव्या हातावरील मासळी बाजारातील दुर्गंध नाकात शिरला. पुढे तलावाच्या काठावर जिथे वाहनांची पार्किंग आहे तिथे चिकन, मटण मार्केट आणि तेथील निरुपयोगी मांस, कचरा पाहून शिसारीच आली. खरेतर गोकूलनगर तलाव भव्य आहे. एखाद्या शहराच्या मध्यभागी तलाव असणं ते त्या शहराचं भाग्य समजलं जातं. शहर प्रशासन आणि नागरिकही त्याला जपतात. कोल्हापूरचा रंकाळा तलाव असो, नागपूरचा गांधीसागर, अंबाझरी असो की, चंद्रपूरचा रामाळा तलाव निदान काही प्रमाणात ते जपण्यात आले आहेत. पण, या तलावाच्या बाबतीत सगळाच आनंदी आनंद दिसून आला.

गडचिरोली शहराचे वैभव जपण्यात लोकप्रतिनिधी अपयशी
गडचिरोली पोलिस, नक्षलवादी चकमकप्रकरणी सी-४७ अलर्ट- प्रमोदकुमार शेवाळे

तलावाची पाळ मजबूत असली येथे माणसे, वाहनांपेक्षा चिखलात लोळणारी डुकरेच अधिक. हा संपूर्ण परिसर नागरिक सुलभ शौचालयासारखा वापरतात. पाळीवर उभा राहून दूरवर नजर टाकली. पावसाने तलाव तुडुंब भरला होता. परंतु त्याच्या विस्तीर्ण पाणपसाऱ्यावर इकॉर्निया ही निरुपयोगी आणि जलजीवांचा कर्दनकाळ असलेली वनस्पती पसरलेली दिसली. डाव्या हातावर पार्किंगच्या जागेवर चिकन, मटणची दुकाने व त्याच्या बाजूला रखडलेल्या सौंदर्यीकरणाचे भग्नावशेष दृष्टीस पडले. कधीकाळी येथे छोटी बाग, बोटिंगची व्यवस्था आणि इतर सौंदर्यीकरणाचा प्रयत्न झाला; परंतु ते काम रखडले ते रखडलेच. तलावालगत गोकूलनगरचा भाग आणि त्याच्या बाजूला चनकाईनगरचा परिसर. यातील अनेक घरे जणू तलावातच बांधलेली दिसत होती.

गडचिरोली शहराचे वैभव जपण्यात लोकप्रतिनिधी अपयशी
गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 1400 कोटी रुपयांची मोहाची उलाढाल

तलाव कुणाच्या अखत्यारित?

१९८२ पूर्वी गडचिरोली एखाद्या ग्रामीण भागासारखे होते. येथील शेतीला मामा (माजी मालगुजारी) तलावांचे पाणी मिळायचे. तलावांच्या सिंचन क्षमतेनुसार हे तलाव कुणाच्या अखत्यारित द्यायचे, हे सरकार ठरवायचे. ० ते १०० हेक्टरची सिंचन क्षमता असलेले तलाव देखभाल, दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे दिले जातात. १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमता असलेले तलाव जलसंधारण विभाग (राज्य) यांना हस्तांतरित केले जातात. तर २५० हून अधिक सिंचन क्षमता असलेल्या तलावांच्या देखभालीचे काम जलसंपदा विभागाकडे असते. हा तलाव २५० हून अधिक सिंचन क्षमतेचा असल्याने जलसंपदा विभागाच्या अखत्यारित आहे.

गडचिरोली शहराचे वैभव जपण्यात लोकप्रतिनिधी अपयशी
Postive Story : पुणे-गडचिरोली मदतीचा ‘मॉडर्न’ सेतू

शहरातील या भव्य तलावाचे सौंदर्यीकरण अनेक वर्षांपासून रखडले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. नुकतेच निधी मंजूर केला असून, लवकरच या तलावाचे सौंदर्यीकरण होईल. त्यानंतर हा तलाव नगर परिषदेला हस्तांतरित करण्यात येणार आहे.

- दीपक सिंगला, जिल्हाधिकारी, गडचिरोली

हा माजी मालगुजारी तलाव शेतीच्या सिंचनासाठी असल्याने अनेक अडचणी आल्या. पण, त्या सर्वांनी एकत्र येऊन सोडविल्या. आता तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर झाला. सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण होताच त्याचे अधिकार नगर परिषदेकडे येतील. मग योग्य नियोजन करून इतरही विकासकामे करण्यात येतील.

- संजीव ओहोळ, मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिरोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()