नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळला; एकाची केली हत्या

नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळला; एकाची केली हत्या
Updated on

गडचिरोली : भामरागडअंतर्गत येणाऱ्या पोमके ताडगाव हद्दीतील मडवेली जंगल परिसरात रविवारी (ता. १९) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास विशेष अभियान पथकाने अभियान राबविले. जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी जवानांना ठार मारण्याच्या उद्देशाने अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरात नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

२१ सप्टेंबर २०२१ रोजी होणाऱ्या विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी आयईडी व कुकर बॉम्ब लावून मोठी घातपाताची योजना आखली होती. जवानांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा कुटील डाव उधळून लावण्यात गडचिरोली पोलिस दलास मोठे यश आले आहे. चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळाच्या निरीक्षणावरून अंदाजे ३५ ते ४० नक्षलवादी शिबिर लावून असल्याचे दिसून आले.

नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळला; एकाची केली हत्या
७० विद्यार्थ्यांना डेंगीसदृश्‍य आजार; २५ विद्यार्थ्यांना निदान

घटनास्थळावरून आयईडी, कुकर बॉम्ब, मोठ्या प्रमाणावर पिट्टू व नक्षल साहित्य हस्तगत करण्यात यश प्राप्त केले. आयईडी व कुकर बॉम्ब हे अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले. जवानांनी नक्षलविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करीत मोठे शिबिर उधळून लावले. अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सर, अपर पोलिस अधीक्षक अहेरी (अभियान) मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक समीर शेख सर (प्रशासन), सी-६० प्रभारी अभिजित पाटील यांनी नक्षल विरोधी अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

नक्षलवाद्यांनी केला एकाचा खून

एटापल्ली तालुक्यातील सोमाजी सडमेक (वय ४५) या इसमाचा नक्षलवाद्यांनी खून करून मृतदेह हातपंपाजवळ फेकून दिल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हेडरी येथून रात्री घरातून अपहरण करून सुरजागड मंदिरालगत असलेल्या बोरिंगजवळ हत्या करून फेकून दिले. पोलिसांचा खबऱ्या असल्याचा नक्षल्यांना संशय होता. नक्षल्यांनी अचानक डोके वर काढल्याचे दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()