Gadchiroli News : अंधश्रद्धा सोडून वैद्यकीय उपचाराकडे वळण्याची शपथ, अपर जिल्हाधिकाऱ्यांनी राबवली अभिनव लोकजागर मोहीम

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या नेतृत्वाखाली अंधश्रद्धा सोडून वैद्यकीय उपचार घेण्याची शपथ गावकऱ्यांना देण्यात आली. जनजागृतीसाठी अभिनव लोकजागर मोहीम राबवण्यात आली.
Gadchiroli News :
Gadchiroli News sakal
Updated on

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दोन बालकांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर जनसामान्यात असलेल्या अंधश्रद्धा व तातडीच्या वैद्यकीय उपचाराविषयीची अनास्था प्रकर्षाने जाणवल्याने याबाबत जनजागृतीकरिता अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी जिल्हा प्रशासनामार्फत अभिनव लोकजागर मोहीम राबवून जिमलगट्टा परीसरातील नागरिकांना अंधश्रद्धा निर्मूलनाची व प्राधान्याने वैद्यकीय उपचार घेण्याची शपथ दिली.

नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागात असलेल्या येर्रागड्डा येथे प्रत्यक्ष जाऊन मृत्यू झालेल्या मुलांच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. घडलेल्या दुर्दैवी घटनेविषयी चौकशी करून दुःख ओढवलेल्या दाम्पत्याच्या उपस्थितीत गावकऱ्यांसोबत संवाद साधत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी माडिया व तेलगू भाषेत शपथ घेण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.