PM आवास योजना; जाचक अटींमुळे घरकुलाचे स्वप्न अपूर्ण राहण्याचा धोका

संपूर्ण महाराष्ट्रात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अ, ब तसेच ड वर्गातील घरकुल लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले
PM Awas Yojana conditions keep away from your dream of home amravati
PM Awas Yojana conditions keep away from your dream of home amravatisakal
Updated on

अमरावती : जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अ, ब तसेच ड वर्गातील घरकुल लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले आहे. परंतु ज्या नागरिकांची नावे ‘ड’ यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशांना घरकुलासाठी असलेल्या जाचक अटींमुळे वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील घरकुलासंबंधी असलेल्या जाचक अटी रद्द करून अनुदान वाढविण्याची मागणी होत आहे.

ज्या नागरिकांची नावे ‘ड’ यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा गरीब नागरिकांना घरकुलासाठी असलेल्या जाचक अटींमुळे लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे गरीब नागरिकांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशातील गरीब नागरिकांना पक्क्या घराचे स्वप्न दाखविले, परंतु अशा जाचक अटींमुळे त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहण्याची चिन्हे दिसत आहेत. विविध कारणांमुळे लाभार्थ्यांची नावे यादीमधून कमी करण्यात आली आहेत. त्यातच महागाईमुळे योजना सुरू केली त्यावेळेच्या साहित्याच्या किंमतीपेक्षा आजच्या किंमती दीडपटीने वाढल्या आहेत.

या अटींचा अडथळा

  • घरी दुचाकी, चुकीचा आधार क्रमांक, घरी दूरध्वनी असणे

  • एक खोली बांधलेली आहे असे लाभार्थी

  • व्यवसायाकरिता रिक्षा घेतली असल्यास तसेच दोन खोल्यांपेक्षा जास्त खोल्या नसाव्यात

  • घरातील सदस्यांचे वार्षिक उत्पन्न ५० हजारांपेक्षा जास्त नसावे

  • पाच एकरपेक्षा जास्त शेती नसावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()