चंद्रपूर : केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी तर राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी बारा हजार रुपयांचा निधी मिळतो. योजनेत सहभागी होण्यासाठी पोर्टलवर नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांना आपला भ्रमणध्वनी क्रमांक टाकावा लागतो.