PM Modi : ‘काँग्रेस’चा विचारच परदेशी; वाशीमच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा घणाघात

‘ देशातील दलित, आदिवासी, बंजारा यांना काँग्रेसने त्यांच्या शासनकाळात गुन्हेगार घोषित केले.
PM Narendra Modi
PM Narendra Modi esakal
Updated on

वाशीम : ‘‘ देशातील दलित, आदिवासी, बंजारा यांना काँग्रेसने त्यांच्या शासनकाळात गुन्हेगार घोषित केले. या पक्षाचा विचारच परदेशी आहे,’’ अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे सभेत बोलताना केली. पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे सांस्कृतिक प्रतीक असलेल्या ‘नंगारा भवन’ या सांस्कृतिक संग्रहालयाचे लोकार्पणही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज झाले.

यानंतर झालेल्या जाहीर सभेला मार्गदर्शन करताना त्यांनी काँग्रेस व महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठविली. ‘‘ काँग्रेस पक्ष घराणेशाहीचा उत्तम नमुना असून हा पक्ष शहरी नक्षलवादी चालवीत आहेत. युवकांना नशेच्या गर्तेत लोटण्याचे काम काँग्रेसकडून होत असल्याचे दिल्लीतील ड्रग्ज प्रकरणातून उघड झाले आहे.

काँग्रेसने देशातील शेतकऱ्यांना लुटण्याचे काम केले असून गोरगरिबांना भाजप सरकार देत असलेल्या मदतीला काँग्रेसचा विरोध आहे,’’ असे ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, ग्रामविकासमंत्री राजीवरंजन सिंग, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह वाशीम व यवतमाळ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

‘नंगारा वास्तू’चे लोकार्पण करण्याआधी मोदी यांनी जगदंबा देवी मंदिरात पूजा केली. देवीला भंडारा अर्पण करून संत सेवालाल महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर संत रामराव महाराज समाधी मंदिरात पूजा करून त्यांनी नगारा वाजविला.

‘काँग्रेस’चा विचारच परदेशी ३० हजार कोटींच्या योजनांचे लोकार्पण

पंतप्रधान मोदी यांनी पोहरादेवी येथून राज्यभरातील ३० हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण केले. यामध्ये सोलर एनर्जी प्लांट, गाईची आनुवांशिकता सुधारण्यासाठी जिनोम चीप प्रकल्प तसेच शेतकरी सन्मान निधीचे ९ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या योजनांचा यात समावेश आहे.

पवार शेती सोडून क्रिकेटमध्ये रमले

‘‘ शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना शेती सोडून ते क्रिकेटच्या मैदानावर जास्त रमले. त्यांच्या कार्यकाळात शेतकरी रसातळाला गेला होता,’’ अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना सन्मान देण्याचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.