यवतमाळ : मुस्लिम समाजाच्या लग्नात बिर्याणी (biryani) खाल्ल्याने सुमारे दोनशे जणांना विषबाधा (Poisoning) झाली. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील ईसापूर धरण येथे घडली. १८ रुग्णांना पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर काहींना कळमनुरी, उमरखेड, हदगाव, शेंबाळपिंपरी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. (Poisoning of 200 people from biryani during wedding ceremony)
प्राप्त माहितीनुसार, पुसदपासून २८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ईसापूर येथे मुस्लिम समाजाचा लग्न समारंभ (wedding ceremony) होता. लग्नासाठी पाहुण्यांचा मेळा जमला. जेवणात बिर्याणीचा बेत होता. पाहुण्यांनी बिर्याणीवर (biryani) ताव मारल्यानंतर काहींना पोटात दुखू लागले. नंतर शौचास होऊ लागली. काहींना ओकाऱ्या झाल्यात. ही लक्षणे पाहताच अन्न विषबाधेचा प्रकार असल्याचे लक्षात आले.
हा प्रकार कळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जय नाईक यांनी शेंबाळपिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळी तातडीने भेट देऊन रुग्णांच्या उपचाराबद्दल माहिती घेतली. पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण १८ जणांना भरती करण्यात आले. या रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. १४ जणांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली. इतर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांची तब्येत चांगली असल्याचे सांगण्यात आले.
विषबाधा नक्की कशामुळे?
अन्नातून विषबाधा (Poisoning) झालेल्या रुग्णांना पुसद येथे भरती करण्यात आले. या रुग्णांना शौचाचा त्रास असला तरी ओकाऱ्या नव्हत्या. अन्न विषबाधेत मात्र हे दोन्ही प्रकार आढळून येतात. त्यामुळे विषबाधा नक्की कशामुळे झाली याबद्दल संशय व्यक्त होत आहे. वैद्यकीय अधिकारी ही याबद्दल साशंक आहे.
आमदार इंद्रनील नाईक यांची भेट
विषबाधा (Poisoning) झाल्याची माहिती मिळताच आमदार इंद्रनील नाईक यांनी तातडीने रुग्णालयात भेट दिली व बाधितांची विचारपूस केली. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस डॉ. महम्मद नदीम, माजी नगरसेवक साकिब शाह यांनीही भेटी दिल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.