वाढदिवसाचा केक खाल्याने चिमुकल्यांना विषबाधा

cake
cake
Updated on

आर्णी (जि. यवतमाळ) : वाढदिवस म्हणजे जीवनातील एक वर्ष कमी होणे असते. परंतु, जन्म उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. वाढदिवशी कुटुंब व मित्रांसोबत केक कापने आजची स्टाईल झाली आहे. असाच वाढदिवस साजरा केल्यानंतर केक खाल्याने सहा चिमुकल्यांना विषबाधा झाली. हा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरात घडला.

शास्त्रीनगरातील मुलीच्या वाढदिवसाचा छोटेखानी कार्यक्रम मंगळवारी (ता. २१) पार पडला. वाढदिवसाला परिसरातील काही चिमुकल्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सायंकाळी सात वाजता वाढदिवसाचा केक कापला गेला. उपस्थित नातेवाइक व मित्रांना केक भरविला गेला. चिमुकले वाढदिवस साजरा केल्यानंतर आपापल्या घरी परतले.

cake
शिवसेनेला धक्का! निवडणुकीच्या तोंडावर गजानन चिंचवडे भाजपमध्ये

मात्री, रात्री नऊ वाजतापासून चिमुकल्यांना उलट्या सुरू झाल्या. एका पाठोपाठ एक असे सहा चिमुकले संजीवनी पुरुषोत्तम पुंसाडे (वय १०), सोनिफ शकंर सोलंके (वय ४), अथर्व विनोद बुटले (वय १०), आरती आत्माराम जारंडे (वय १४), वृक्षाली गजेद्र देशमुख (वय १०) व स्मित शिवराज जाधव (वय ९) यांना उलट्या झाल्याने उपचारासाठी आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळीच उपचार मिळाल्याने सहाही विषबाधित चिमुकले बरे झाले. यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.