अमरावती : वलगाव ते दर्यापूर मार्गावरील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात वलगाव पोलिसांनी त्यांच्या कारचा चालक बंडू इंगोले यांची चौकशी करून बयाण नोंदविले.
वलगावचे पोलिस निरीक्षक वैभव पानसरे यांनी सदर वृत्ताला दुजोरा दिला. आतापर्यंत पोलिसांनी त्यांच्या मोबाईलची तांत्रिक माहिती, संपर्कातील काही मित्रमंडळी, अशा पाच ते सहा जणांचे बयाण नोंदविले. सोमवारी (ता. ३० सप्टेंबर) रात्री शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट कारने अमरावतीवरून दर्यापूरला जात असताना वलगाव हद्दीत त्यांच्या कारवर कुणीतरी तीन गोळ्या झाडल्या.
सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. घटनेच्या वेळी श्री. अरबट यांच्या कारमध्ये त्यांचा चालक बंडू इंगोले हजर होता काय, यासंदर्भात त्याची चौकशी केली असता त्याने ठोस अशी माहिती दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेच्या वेळी श्री. अरबट हे एकटेच कार चालवित होते, अशी माहिती चालक इंगोले यांनी दिल्याचे पोलिस निरीक्षक श्री. पानसरे यांनी स्पष्ट केले.
चालक श्री. इंगोले यांची चौकशी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या कारवर कुणी व कशासाठी गोळ्या झाडल्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आठवड्याभरात पोलिस ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.