पांढराबोडीत पोलिस खबऱ्यांचे जाळे

पांढराबोडीत पोलिस खबऱ्यांचे जाळे
Updated on

नागपूर - कुख्यात गुन्हेगार आणि टोळीयुद्धाची जन्मभूमी म्हणून पांढराबोडी परिसराची ओळख. पांढराबोडीतील अशिक्षित नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे अमली पदार्थ, दारूचे व्यसन युवकांना जडलेले आहे. अशातच पोलिसांना मदतीसाठी कुणी धावत नाहीत. मात्र, बिट सिस्टिमची सुरुवात झाली आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा ताफा किचकट असलेल्या वस्तीतही दिसू लागला. 

सामान्य नागरिकांना पोलिसांबाबत आदर निर्माण झाला तर गुन्हेगारांच्या छातीची धडधड वाढली. 

बिट सिस्टिममुळे पोलिस अधिकारी कायमस्वरूपी चौकीत बसू लागले. त्याचा परिणाम सामान्य नागरिकांशी संपर्क वाढला. त्यांच्यात सुसंवाद निर्माण झाला. त्यामुळे पोलिस आणि नागरिकांचे एक बंध निर्माण झाले. परिणामतः अनेक गुन्हेगारांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचू लागली. मोठा गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिस प्रतिबंधात्मक कारवाई करीत गुन्हेगारी नियंत्रित करीत आहेत.

लूटमार रोखण्यासाठी गस्त वाढविली 
सुसाइड पॉइंट असलेल्या फुटाळा आणि अंबाझरी तलावाचा समावेश अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांना रोखण्याचे मोठे आव्हान आहे. यासोबतच प्रेमीयुगुलांचा नेहमीचाच त्रास पोलिसांना असतो. अंबाझरी आणि फुटाळा तलावावर दुर्गादेवी विसर्जन आणि गणेश विसर्जनाचा मोठा बंदोबस्त सांभाळावा लागतो. रामनगर, रविनगर आणि पांढराबोडी अशी तीन बिट ठाण्याच्या हद्दीत आहेत. तसेच तेलंगखेडी गार्डन परिसरातील लूटमार रोखण्याबाबत पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. 

पोलिसांसमोरील समस्या
पांढराबोडीसारख्या परिसरातील कुख्यात गुंडांवर पोलिसांचा वॉच आहे. मात्र, अवैध दारूविक्रेते चोरून किंवा अंधाराचा फायदा घेऊन दारू विकतात. व्यापारी संकुल असल्यामुळे बॅग लिफ्टिंग, घरफोडी, चेनस्नॅचिंगसारखे गुन्हे पोलिसांसमोर आव्हान आहे. शॉपिंग रोड असल्यामुळे ट्रॅफिक जॅम ही मोठी समस्या आहे. पांढराबोडीत गंभीर गुन्हे घडतात. या भागात गुन्हेगारीचेही प्रमाण जास्त आहे. डीजेचा आवाज आणि एनसी तक्रारींचीही चांगलीच भरमार आहे.

पांढराबोडीतील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी बेरोजगारांची यादी तयार केली. बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही केला. अनेकांना रोजगार मिळाला तर काही गुन्हेगारांना हातठेला, पाणीपुरी किंवा भाजीपाल्याचे दुकान लावण्यास मदत केली. व्यापारी वर्ग आणि नागरिकांची बैठक घेतली जाते. सीसीटीव्ही लावण्याबाबत सूचना करणे तसेच सुरक्षारक्षकांशी सुसंवाद साधून बिटमध्ये नेहमीसाठी कार्यरत राहण्यावर अधिकारी भर देत आहेत. याच कारणामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळत आहे.
- अतुल सबनिस, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबाझरी पोलिस स्टेशन

रविनगर बिट
प्रभारी - यशवंत नैताम (सहायक पोलिस निरीक्षक) मो. ७३०४८०७६७६
एकूण कर्मचारी - ०९ लोकसंख्या - ५०,००० गुन्हेगार - १२ 

बिटच्या सीमा
लॉ कॉलेज चौक, लेडीज क्‍लब चौक, कॅम्पस चौक, फुटाळा आणि सीपी क्‍लब.

महत्त्वाची ठिकाणे
फुटाळा तलाव, रविनगर वसाहत, तेलंगखेडी गार्डन, तेलंगखेडी शिवमंदिर, लॉ कॉलेज चौक, व्हीआयपींची वसाहत. 

गोकुळपेठ बिट
प्रभारी - सोनूताई झामरे, सहायक पोलिस निरीक्षक
मो. ९०११००८९३०
कर्मचारी - १०, गुन्हेगार - १०, लोकसंख्या - ६०,०००

बिटच्या सीमा
रविनगर, लॉ कॉलेज चौक, रामनगर, व्हीएनआयटी कॉलेज चौक, शंकरनगर चौक, लॉ कॉलेज गेट.

प्रमुख ठिकाणे
गोकुळपेठ मार्केट, रामनगर चौक, टिळकनगर, शंकरनगर चौक, शिवाजीनगर.

पांढराबोडी बिट
प्रभारी - बळवंत कुरेवाड, पोलिस उपनिरीक्षक
मो. ९६२३४५७५२१
कर्मचारी - ११, गुन्हेगार - १२५, तडीपार - १५
प्रतिबंधात्मक कारवाई - ४५
लोकसंख्या - ७५,०००

बिटच्या सीमा
रविनगर चौक, कॅम्पस चौक, सुभाषनगर टी पॉइंट, रामनगर यशवंतनगर ते मरारटोळी.

प्रमुख ठिकाणे
पांढराबोडी झोपडपट्‌टी, हिलटॉप अंबाझरी, अंबाझरी गार्डन आणि तलाव, अंबाझरी बायपास रोड, गांधीनगर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.