एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक, महापालिकेसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणीला सुरुवात

political parties prepare for amravati municipal corporation
political parties prepare for amravati municipal corporation
Updated on

अमरावती : पुढील महिन्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर तब्बल सव्वावर्षाने होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांसाठी आतापासूनच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडी विरोधात भाजप, अशी रंगणार असून या निवडणुका एकसदस्य पद्धतीने होणार आहेत. जनगणना झाली नसल्याने व पुढील वर्षी ती प्रस्तावित असून लोकसंख्या वाढीवर सदस्यसंख्या अवलंबली आहे.

1983 मध्ये स्थापन झालेल्या अमरावती महापालिकेची पहिली सार्वजनिक निवडणूक 1992 ला एकसदस्यीय पद्धतीने झाली होती. त्यावेळी 78 सदस्य होते. दुसऱ्या निवडणुकीत 73 सदस्यांसाठी निवडणूक झाली व तीसुद्धा एकसदस्यीय पद्धतीने झाली. 2002 मधील तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका झाल्यात व सदस्यसंख्या 81 झाली. त्यानंतर पुन्हा चौथ्या पंचवार्षिकमध्ये 2007 मध्ये एक सदस्य पद्धतीने झालेल्या निवडणुकीतही 81 सदस्यसंख्या कायम राहिली. 2011 च्या जनगणनेनंतर मात्र महापालिकेतील सदस्यांची संख्या सहाने वाढून 87 झाली.

पाचव्या पंचवार्षिकमध्ये 2012 ची निवडणूक दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यात आली. यावेळी 43 प्रभाग तयार करण्यात आले होते. त्यानंतर 2017 मधील निवडणूक युती सरकारने चारसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेतली. 22 प्रभागांतून चार व एका प्रभागातून तीन, असे 87 नगरसेवक निवडून आले. बहूसदस्यीय प्रभाग पद्धतीचा लाभ भाजपला अधिक झाला. बहूमताने सत्ता आली. बहूसदस्यीय प्रभाग पद्धतीत भाजपला होणारा लाभ लक्षात घेत महाविकास आघाडीने आता मुंबई वगळता उर्वरित महापालिकांच्या निवडणुका एकसदस्यीय पद्धतीने घेण्याचे विधेयक संमत केले आहे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक एकसदस्य पद्धतीने होत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आगामी सव्वावर्षाने अमरावती महापालिकेच्या निवडणुकाही याच पद्धतीने होणार आहेत, हे स्पष्ट आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुका 2011 च्या जनगणनेनुसार होतील का? हे स्पष्ट नाही. पुढील वर्षात जनगणना होणे अपेक्षित असली तरी त्याचा प्राथमिक डेटा उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणुका होणार आहेत. त्यावर सदस्यसंख्या कमी अधिक अवलंबिली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.