अमरावती : जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. विदर्भाभोवतीही कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. त्यात अमरावती जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. प्रशासनाकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत तरीही प्रशासनाला यश येत नाहीये. म्हणूनच आता अमरावतीला कोरोनमुक्त करण्यासाठी काही भक्कम हात पुढे सरसावले आहेत.
अमरावतीमध्ये कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आता अमरावतीत कोरोनाला हरवण्यासाठी जगविख्यात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने पुढाकार घेतला आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी अमरावतीकरांच्या विश्वासाचे केंद्र असणारे पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी पुढाकार घेतला आहे. आपल्या वयाचा विचार न करता तरुणांनाही लाजवेल असा लढा त्यांनी निर्धारित केला आहे. कोरोनाशी रात्रंदिवस दोन हात करणाऱ्या वॉरिअर्सच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ देण्याचा त्यांचा मानस आहे.
अमरावतीला कोरोनापासून वाचविण्यासाठी प्रशासकीय, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या या संकल्पपूर्तीसाठी कंबर कसली आहे. प्रभाकरराव म्हणतात, आज प्रशासन त्यांचे काम करीत आहे, आता आपल्यालाही आपले कर्तव्य दाखविण्याची संधी आली आहे. ज्याप्रमाणे धारावीमधील नागरिकांनी आपल्या जिद्दीने कोरोनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, तो कौतुकास्पद आहे. असेच काहीतरी आपल्या अमरावतीत होईल का? याबाबत मी काही दिवसांपासून तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करतो आहे.
पैसा, सत्ता, पद काहीच नको
आम्हाला पैसा, सत्ता, पद काहीच नको, फक्त माणुसकी जिवंत राहिली पाहिजे. एकजुटीने कुठलाही धर्म, जातीभेद न करता कोरोनाशी दोन हात करणारे खंबीर वॉरिअर्स आता उभे करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अनेक संस्था, संघटना, नगरसेवक, पदाधिकारी समोर आले आहेत. ही अमरावतीकरांसाठी भूषणावह बाब म्हटली पाहिजे, असेही प्रभाकरराव वैद्य म्हणाले.
अमरावती पॅटर्नचे अनेक जिल्हे करतील अनुकरण
उमरावती वाचविण्यासाठी हेल्पलाईनच्या पुढाकारातून काही नियोजन करण्यात आले आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यास तसेच नागरिकांचा प्रामाणिक प्रतिसाद मिळाला तर 100 टक्के अमरावतीकर कोरोनाच्या मगरमिठीतून बाहेर पडतील. याच अमरावती पॅटर्नचे अनुकरण अन्य जिल्हेसुद्धा करतील यात शंका नाही.
- पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, प्रधान सचिव, हव्याप्र मंडळ
संपादित : अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.