मनपाच्या कचऱ्याला कॉंग्रेसचा विरोध ! शहर कॉंग्रेसचे आंदोलन : घनकचरा संकलनाची निविदा रद्द करण्याची मागणी

At present, the atmosphere in Chandrapur Municipal Corporation is very hot due to the tender for solid waste collection
At present, the atmosphere in Chandrapur Municipal Corporation is very hot due to the tender for solid waste collection
Updated on

चंद्रपूर : घनकचरा संकलनाच्या निविदेवरून सध्या मनपातील वातावरण चांगलेच तापले आहे. ही निविदाच रद्द करण्यासाठी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात मनपासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. 

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शहरातील घनकचरा गोळा करणे. कंपोस्ट डेपोपर्यंत कचरा वाहतूक करणे या कामासाठी निविदा मागितल्या होत्या. या कामासाठी मे.स्वयंभू ट्रान्स्पोर्ट पुणे या कंत्राटदाराचा 1700 रुपये प्रती मेट्रीक टन हा सर्वांत कमी दर होता. त्यामुळे या कंत्राटदाराला दहा वर्षांसाठी कंत्राट मंजूर करण्यात आले. मात्र, नंतर मनपातील सत्ताधाऱ्यांनी हे कंत्राट रद्द केले. त्यानंतर नवीन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. नवीन कंत्राटात मे.स्वयंभू ट्रान्स्प्रोर्ट या कंत्राटदाराने पुन्हा प्रती मेट्रिक टन 2552 रुपये दराची निविदा सादर केली. ही निविदा सर्वांत कमी दराची असल्याने या कंत्राटदारास स्थायी समितीने कंत्राट मंजूर केले आहे. 

मात्र, जुन्या आणि नवीन दरात तब्बल साडेआठशे रुपयांची दरवाढ आहे. यामुळे मनपाला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप यापूर्वी तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केला होता. यावेळी तिवारी यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने निवेदन दिले. निविदा रद्द करण्याची मागणी केली. यावर निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. आंदोलनात महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, महिला आघाडी शहराध्यक्ष सुनीत अग्रवाल, नगरसेवक प्रशांत दानव, नीलेश खोब्रागडे, अमजद अली, विना खनके, संगीता भोयर, ललिता रेवेल्लीवार यांच्यासह सोहले शेख, अश्‍विनी खोब्रागडे, विजय चहारे, सुनील वडस्कर, प्रसन्ना शिरवार, मनीष तिवारी, विजय धोबे, उमाकांत धांडे, सचिन कत्याल, कुणाल चहारे, राजेश अड्डूर, रुचित दवे, पप्पू सिद्दीकी, अजय बल्की आदी पदाधिकारी सहभागी झाले होते
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.