इंग्लंमध्येही भारताचा झेंडा; 'हॉर्नबी ट्रस्ट'च्या विश्वस्तपदी भंडाऱ्याचे प्रो. अमोल पदवाड, पहिल्यांदाच भारतीय व्यक्तीची निवड

professor amol padwad from bhandara appointed as trustee of hornby trust in england
professor amol padwad from bhandara appointed as trustee of hornby trust in england
Updated on

नागपूर : प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि ऑक्‍सफर्ड डिक्शनरीचे संस्थापक ए. एस. हॉर्नबी यांच्या स्मरणार्थ इंग्लंड येथे हॉर्नबी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. इंग्रजी विषयाची सर्वोच्च संस्था असलेल्या या संस्थेवर गेल्या ६० वर्षांनंतर भंडाऱ्याचे प्रो. अमोल पदवाड या मराठी माणसाची विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली आहे. इंग्लंड देशाव्यतिरिक्त निवड होणारे ते पहिलेच ठरलेले आहेत. 

जगभरात इंग्रजी भाषा शिकविणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी 'हॉर्नबी ट्रस्ट'तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यासाठी शिक्षकांना शिष्यवृत्ती देण्यात येते. याशिवाय दरवर्षी इंग्रजी भाषेतील नवे शब्द समावेश असलेली ऑक्‍सफर्ड डिक्शनरी तयार करण्यात येते. या ट्रस्टमध्ये सात विश्वस्तांचा समावेश असतो. ए. एस. हॉर्नबी हे स्वतः इंग्लंडचे असल्याने या देशातील शिक्षकांचा समावेश करण्यात येत होता. मात्र, यावेळी काही विश्वस्त निवृत्त झाल्याने प्रथमच सातपैकी एक प्रो. अमोल पदवाड यांची निवड करण्यात आली आहे. सध्या प्रो. पदवाड हे दिल्ली येथील डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठात इंग्रजी भाषा केंद्राचे संचालक आहेत. त्यांनी धरमपेठ विज्ञान महाविद्यालयातून बीएस्सी पदवी घेतली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातून एम.ए. अभ्यासक्रम पूर्ण केला. 

यानंतर हैदराबाद येथील ईएससी विद्यापीठातून पदविका आणि रशियन भाषेत एम.ए. केले. यानंतर त्यांनी इंग्लंड येथील 'लिड' विद्यापीठातून एम.एड. अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यासाठी १९९९ साली त्यांना हॉर्नबी ट्रस्टद्वारे शिष्यवृत्ती देण्यात आली होती. तत्पूर्वीच ते भंडाऱ्यातील जे. एम. पटेल महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तीन वर्षांपूर्वीच दिल्ली येथील डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठात इंग्रजी भाषा केंद्राचे संचालक म्हणून रुजू झालेत. मात्र, आता त्यांची हॉर्नबी ट्रस्टच्या विश्वस्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने विद्यापीठ आणि मराठी माणसाची मान उंचावली आहे. 

‍ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या आठव्या आवृत्तीत योगदान - 
प्रो. अमोल पदवाड यांनी हॉर्नबी ट्रस्टद्वारे प्रकाशित होणाऱ्या ऑक्सफर्ड अ‌ॅडव्हान्स डिक्शनरीच्या आठव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत योगदान देण्याचा मान मिळाला आहे. एका भारतीयाला हा सन्मान मिळणे ही अभिमानाची बाब आहे. 
 
हॉर्नबी ट्रस्ट इंग्रजीच्या विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविते. त्यांच्या शिष्यवृत्तीतून एम.एड. करता आले. आज त्याच ट्रस्टचा विश्वस्त म्हणून निवड झाल्याचा अभिमान आहे. 
-प्रो. अमोल पदवाड, विश्वस्त, हॉर्नबी ट्रस्ट, इंग्लंड. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.