मोबाइल प्रतिबंधित क्षेत्रातच ‘क्यूआर’ कोड

petrol pamp.
petrol pamp.
Updated on

अकोला : नियमानुुसार पेट्रोलपंपावर ज्वलनशील पदार्थासह मोबाइल वापरण्यास बंदी आहे. असे असतानाही प्रतिबंधित क्षेत्रातच शहरातील बहुतांश पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंटसाठी ‘क्यूआर’ कोड लावल्याचे वास्तव आहे. हीबाब अपघाताला आमंत्रण देणारी ठरू शकते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देवून वाहनधाराकांच्या सुरक्षेचे मानकं पाळले जावे, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

जीवावरही बेतू शकते
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत शिवणी येथील नॅशनल पेट्रोल पंपावर एटीएम कार्डावरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी स्वाईप मशीनचा वापर केल्या जातो. परंतु, त्याचबरोबर मोबाईलवरून पेमेंट करण्यासाठी थेट पेट्रोलच्या मशीनवरच ‘क्यूआर’ कोड लावण्याची जाखीम पेट्रोल पंप चालकाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी शॉर्टकट आणि सुयस्क ठरणारी ही सेवा एक दिवस सर्वांच्याच जिवावर बेतणारी ठरणार आहे. पेट्रोल पंपाच्या परिसरातच मोबाईल, सिगारेट किंवा ज्वलनशील पदार्थ वापरण्यास बंदी असल्याचे सूचना फलक संबंधित पंप चालकांच्याकडून लावल्या जाते. 

नियमांची केली पायमल्ली
सर्वसामान्य ग्राहकांनी पेट्रोल पंपावर मोबाईलचा वापर केला तर लगेच पंपावरील कर्मचाऱ्यांकडून त्याला दम देऊन मोबाईल बंद ठेवण्यास सांगतात. त्यांचा तो निर्णयही सर्वांच्या हिताचा असल्याने त्यांना कोणी विरोद्धही करत नाही. परंतु, शिवणीमधील पेट्रोल पंप चालकांनी सर्व नियमाला बाजुला ठेऊन जिथे मोबाईल, सिगारेट बंधनकार असल्याचे चिन्ह लावले आहे त्याला लागूनच मोबाईलने पेमेंट करण्यासाठी ‘क्यूआर’ कोड लाऊन परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात टाकला आहे. याच पंपावरून काही शासकीय यंत्रणाही नियमित ये-जा करत असताना देखील याबाबत पेट्रोल पंप चालकाला कुणीही आजपर्यंत साधे हटकले सुद्धा नाही. आधीच 40 डिग्रीच्यावर तापणाऱ्या अकोला शहरात उन्हाळ्याच्या दिवसात अनावश्‍यक बाबीमुळे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे वेळीच संबंधित पंप चालकाविरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे.

होऊ शकतो मोठा अपघात
डिजिटल युगात आर्थिक देवाण-घेवाणसाठी एटीएम स्वाईप मशीन किंवा मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲप्स् चा उपयोग केला जातो. परंतु, मोबाईल वापरण्यावरच बंदी असलेल्या पेट्रोल पंप परिसरात चालकाकडून चक्क ‘क्यूआर’ कोड लावण्यात आला आहे. अशावेळी पेमेंट करण्यासाठी ग्राहकाने देखील मोबाईलचा वापर केला तर परिसरात स्फोट होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते. आणि यामध्ये अनेकांना आपल्या प्राणास देखील मुखावे लागणार आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

‘क्यूआर’ कोड लावणे चुकीचे आहे
या परिसरात मोबाईल वापरण्यास बंदी आहे. आम्हच्याकडून लावल्या गेलेला ‘क्यूआर’ कोड चुकीची गोष्ट आहे. मॅनेजरला सांगून तत्काळ ‘क्यूआर’ कोड काढायाला लावतो.
-नरेश अग्रवाल, पेट्रोल पंप चालक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.