वर्धा : बजाज परिवार आणि वर्ध्याचे नाते अतुट आहे. इतिहासात वर्ध्याची ओळख झाली ती याच परिवारामुळे. महात्मा गाधींना देखील बजाज कुटुंबीयांनीच वर्ध्यात (Mahatma Gandhi Bajaj Family Relation) आणलं. महात्मा गांधी यांना वर्ध्यात आणण्याचे सर्व श्रेय जमनालाल बजाज यांना आहे. इतिहासात जमनालाल बजाज यांना महात्मा गांधींचे मानसपूत्र म्हणून ओळखले जाते. सध्या असलेल्या सेवाग्राम आश्रमाची जमिनही बजाज यांच्याच मालकीची होती. (Rahul Bajaj Passes Away)
सध्या वर्ध्याच्या शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत असलेले या परिवातील ज्येष्ठ सदस्य तसेच तब्बल पाच दशक बजाज समूहाच नेतृत्व करणारे ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांचे निधन झाले. राहुल बजाज यांनी वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ८५० पेक्षा अधिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी इ-लर्गिंग उपकरणे, अनेक शाळांमध्ये वर्गखोली व स्वच्छता गृहांची बांधकामे, दुरुस्ती करून दिली. तसेच सध्या जिल्ह्यातील १४ शाळा शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी आणि शाळांच्या भौतिक सुविधांसाठी बजाज यांनी दत्तक घेतल्या आहेत. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान विसरता येणार नाही. राहुल बजाज १९९५ मध्ये वर्ध्यातील शिक्षा मंडळाचे व्यवस्थापक झाले. त्यानंतर शिक्षा मंडळाच्या माध्यमातून अनेक मोठी महाविद्यालये आली. राहुल बजाज शिक्षा मंडळाचे व्यवस्थापक होण्यापूर्वीच येथे या परिवाराने जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय, गो.से. वाणिज्य महाविद्यालय, रामकृष्ण बजाज महाविद्यालय यासारखे अनेक महाविद्यालये जिल्ह्याला दिली.
वर्ध्याला कृषी महाविद्यालय, सायन्स सेंटर
राहुल बजाज १९९५ मध्ये वर्ध्यातील शिक्षा मंडळाचे व्यवस्थापक झाले. वर्ध्यात महत्त्वाचा व्यवसाय शेती असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वर्ध्यात कृषी महाविद्यालय आणले. यातून अनेकांनी कृषी शिक्षण घेत शेतीच्या विकासासाठी कार्य केले. यानंतर २००७ मध्ये त्यांनी वर्ध्यात बजाज सायन्स सेंटर दिले. येथे वर्ध्यातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची ओळख देत त्यांना शास्त्रज्ञ होण्यासंदर्भात संधी देण्यात आली. एवढेच नाही तर ते शिक्षा मंडळाचे सदस्य असतानाच २०१७ मध्ये बजाज टेक्नॉलॉजी कॉलेज वर्ध्यात आले. यात केवळ वर्धाच नाही तर आसपासच्या इतर जिल्ह्यातील मुलेही शिक्षण घेत आहेत.
गिताई मंदिराची निर्मिती
जमनालाल बजाच यांच्यानंतर कमलनयन बजाज यांनी वर्ध्याच्या विकासाची धुरा सांभाळली. खासदार झाल्यानंतर त्यांनी गोसंवर्धनाचे महत्त्व सांगण्याकरिता गायीच्या आकारात गिताई मंदिराची निर्मिती केली. येथील प्रत्येक दगडात गीतेचा मराठी अनुवाद कोरला आहे. गीता आणि गायीचे महत्त्व सांगणारी ही कदाचित देशातील एकमेव वास्तू असावी. या सोबतच हरिजनांसाठी महात्मा गांधी यांनी खुले केलेले लक्ष्मीनारायण मंदिर बजाज परिवारानेच निर्मित केलेले आहे. यासोबतच विश्वशांती स्तुपासाठी जागाही त्यांनी दिली. हे स्तुप जरी फ्यूजी गुरूजी ट्रस्ट सांभाळत असले तरी त्याचे व्यवस्थापन बजाज परिवाराकडे आहे. या शिवाय मगण संग्रहालय, दत्तपूर येथील मनोहर धाम, सर्वसेवा संघ,गोरस भंडार आदीची निर्मिती यात परिवारातून माध्यमातूनच करण्यात आली. या सर्व इमारतींकरिता देण्यात आलेली जागा बजाज परिवाराचीच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.