Amol Mitkari: अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसैनिकाचा मृत्यू; घटनेनंतर नेमकं काय घडलं होतं?

Jay Malokar Amit Mitkari Car Incident: गाडी फोडल्यानंतर मनसेचे नेते जय मालोकर यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना अकोल्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर मनसे नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
Jay Malokar Amit Mitkari Car Incident
Jay Malokar Amit Mitkari Car Incidentesakal
Updated on

Amol Mitkari car was broken by MNS: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी अकोल्यात फोडण्यात आलेली होती. त्या घटनेनंतर ज्या पदाधिकाऱ्याने ही गाडी फोडली, त्यांचा मृत्यू झाला होता. परंतु तो मृत्यू हृदयविकाराने झाला नसून मारहाणीमुळे झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून पुढे आलेलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावरुन राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख 'सुपारीबाज' असा केला होता. यामुळे मनसे सैनिक आक्रमक झाले आणि अकोल्यात मिटकरी यांची गाडी फोडली.

अमोल मिटकरी यांच्या टीकेनंतर मनसे सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना 'सुपारीबाज' म्हणाल्याने मनसे सैनिक संतप्त झाले आणि त्यांनी मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Jay Malokar Amit Mitkari Car Incident
Pooja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट! दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे सुधारित अहवाल; ज्यांनी प्रमाणपत्र इश्यू केलं त्यांना...

गाडी फोडल्यानंतर मनसेचे नेते जय मालोकर यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना अकोल्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर मनसे नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, मनसे सैनिकांनी मिटकरींची गाडी फोडली असेल तर आम्हाला अभिमान आहे.

परंतु दुर्दैवाने या घटनेनंतर मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर संदीप देशपांडे यांनी शोक व्यक्त केला.

नेमकं काय घडलं?

आमदार अमोल मिटकरी यांच्या वरील हल्ला व गाडीची तोडफोड प्रकरणी मनसेच्या तेरा पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी जय मालोकार या कार्यकर्त्याचा रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली. 

या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जय मालोकार असे मृतक पदाधिकाऱ्याचे नाव असून ते मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष होते. घटनेनंतर जय मालोकार याची तब्येत अचानक बिघडली, त्यांना अकोला येथील केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र अचानक त्याचा मृत्यू झाला. पदाधिकाऱ्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली होती. जय यांच्या मृत्यूप्रकरणी आमदार अमोल मिटकरी यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.