- दीपक गिरधर
रामटेक - रामटेकच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. येथे महायुतीचे उमेदवार आशिष जयस्वाल हे पाचव्यांदा नशीब आजमावत आहेत. तर राज्याचे माजी मंत्री काँग्रेस नेते राजेंद्र मुळक हे महाविकास आघाडीचे तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. जयस्वाल व मुळक यांच्यात काट्याची लढत असून हा सामना अतिशय चुरशीचा होणार असे दिसते.