Sanjay Rathod Live Update : सेवालाल महाराजांच्या समाधीचे घेतले दर्शन; बोलण्यास नकार

Rathores early arrival forbade the citizens to go to the temple
Rathores early arrival forbade the citizens to go to the temple
Updated on

पोहोरागड (जि. वाशीम) : राज्याचे वनमंत्री १५ दिवस भूमिगत राहिल्यानंतर मंगळवारी प्रथमच लोकांसमोर आले. ते यवतमाळ येथून पोहोरागडसाठी निघाले असून, लवकरच मंदिरात सहकुटुंब पोहोचणार आहे. येथे महंतांनी होमहवनाची तयारी पूर्ण करून ठेवली आहे. त्यांचे समर्थक स्वागत करण्यासाठी उत्सुक दिसत आहेत.

Live Update

- संजय राठोड पोहोरागडावर पोहोचले
- पोहोरादेवीला नागरिकांची मोठी गर्दी
- राठोड समर्थकांचा गराडा
- समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी
- नागरिकांकडून कोरोनाचे सर्व नियम पायदळी
- पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
- संजय राठोड यांनी घेतले जगदंबा देवीचे दर्शन
- सोशल डिस्टनसिंगची ऐसीतैसी
- संजय राठोड यांची प्रतिक्रिया देण्यास मनाई
- राठोट यांच्या पत्नीचे काहीही बोलण्यास नकार
- सेवालाल महाराजांच्या समाधीचे घेतले दर्शन

परळी (वैजनाथ) येथील टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या प्रकरणात वनमंत्री राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. तेव्हापासून ते भूमिगत होते. आज प्रथमच ते जनतेसमोर आले. साधारणतः अर्ध्या तासात ते पोहोरागड येथे पोहोचणार आहे. या ठिकाणी समर्थक मोठ्या संख्येत जमले आहेत.

पोलिस बंदोबस्तही लावल्यात आलेला आहे. मार्गात प्रत्येक पाच किमीवर बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहेत. लोकांना मंदिराकडे जाण्यास मज्जाव केला जात आहे. दर्शन घेतल्यानंतर ते आपले मत माध्यमांसमोर व्यक्त करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बंजारा समाजासह समर्थकांची गर्दी

पोहरादेवी येथे ना. संजय राठोड यांचे स्वागत करण्यासाठी बंजारा समाजासह समर्थकांची गर्दी झाली आहे. ना. संजय राठोड यांच्यावरील ईडा पीडा टळण्यासाठी महंत सुनील महाराज हे होमहवन करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.