पशुसंवंर्धन विभागाच्या पदभरतीला वर्षोगणती ग्रहण!

0.jpg
0.jpg
Updated on

अकोला : राज्य पशुसंवंर्धन विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदभरतीला वर्षोगणती ग्रहण लागले असून, त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो उमेदवारांना बेरोजगारीचे चटके सोसावे लागत आहेत. बेरोजगारांसोबत २०१६ पासून पशुसंवंर्धन विभागाने ही थट्टा चालविली असून, तेव्हापासून तीन वेळा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत तर, दोन वेळा पदभरती रद्द आणि दोन वेळा पुढे ढकण्यात आली आहे.

राज्यातील ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे यांनी 11 मार्च 2016 रोजी जाहीरात प्रकाशित करून अर्ज मागविले होते. परंतु, तांत्रिक अडचणीचे कारण सांगूण ही जाहीरात रद्द करण्यात आली होती. त्यांनतर 2016 च्या जाहिरातीला अनुसरून पुन्हा 2017 मध्ये 56 पदांकरिता 6 जुलै 2017 रोजी जाहीरात प्रकाशित करुन अर्ज मागविण्यात आले. मार्च 2016 च्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांनाही पुन्हा अर्ज भरण्याचे सूचित करण्यात आले. मात्र, त्यांना फी भरण्याची आवश्यकता नसल्याने दिलासा मिळाला होता. परंतु, उर्वरित हजारो उमेदवारांनी 2017 च्या जाहिरातीला अनुसरून 150 व 300 रुपये फी भरून 26 सप्टेंबर 2017 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर केले. मात्र ही जाहीरात सुद्धा शासनाने स्थगिती दिल्याचे सांगून रद्द करण्यात आली. त्यानंतरही राज्य पशुसंवंर्धन विभागाद्वारे महाराष्ट्रातील बेरोजगारांची थट्टा करण्याचे सत्र थांबले नाही. 27 फेब्रुवारी 2019 रोजी पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर संवंर्गातील 729 जागांसाठी पुन्हा नव्याने जाहीरात काढून अर्ज मागविण्यात आले. यावेळी सुद्धा परीक्षा फी च्या स्वरुपात बेरोजगारांकडून 150 व 300 रुपये या प्रमाणे लाखो रुपये गोळा करण्यात आले. ऑगस्ट 2019 मध्ये या पदांच्या परीक्षेची तारीख निश्चित करुन उमेदवारांना प्रवेशपत्र पाठविण्यात आले. मात्र, ऐन आठवडाभरापूर्वी ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर पुन्हा डिसेंबर 2019 मध्ये याच पदभरतीसाठी परीक्षापत्र उमेदवारांना पाठविण्यात आले आणि पुन्हा आठवडाभरापूर्वी मोबाईलवर मॅसेज पाठवून तांत्रिक कारणाने परीक्षा पूढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. राज्य पशुसंवंर्धन विभागाच्या या थट्टेमुळे वर्षोगणती राज्यातील हजारो उमेदवार बेरोजगारीचे चटके सोसत आहेत.

या पदाकरिता मागविले होते अर्ज
आयुक्तालय पशुसंवर्धन पुणे यांचेतर्फे पशुधन पर्यवेक्षक 41, वरिष्ठ लिपिक चार, लिपिक टंकलेखक पाच, लघुलेखक (उच्चश्रेणी) एक, लघुलेखक (निम्नश्रेणी) एक व वाहन चालक पदाच्या चार जागेंसाठी 6 जुलै 2017 रोजी जाहीरात प्रकाशित करण्यात आली होती. 27 फेब्रुवारी 2019 रोजी प्रकाशित जाहीरातीनुसार मात्र केवळ पशुधन पर्यवेक्षक 149 आणि परिचर संवंर्गातील 580 जागांसाठी नव्याने अर्ज मागविण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()