ऐतिहासिक बावडी, विहिरींचे होणार संवर्धन; मनपा आणि इको प्रोचा पुढाकार; माझी वसुंधरा अभियान

Renovation of historical wells in Chandrapur Renovation of historical wells in Chandrapur
Renovation of historical wells in Chandrapur Renovation of historical wells in Chandrapur
Updated on

चंद्रपूर ः महानगरपालिका, इको प्रो संस्थेतर्फे माझी वसुंधरा अभियानांतर्गत गोंडकालीन ऐतिहासिक बावडी - विहीर स्वच्छता अभियान संयुक्तरीत्या हाती घेण्यात आले आहे. बाबूपेठ येथील अभियानस्थळी शनिवारी (ता. 30) आयुक्त राजेश मोहिते यांनी भेट दिली. ऐतिहासिक विहीर स्वच्छतेची पाहणी केली.

मनपातर्फे सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत मनपा व इको प्रो संस्थेने दुर्लक्षित असलेल्या शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक बावडी - विहीर स्वच्छ करण्याचे संयुक्त अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत बाबूपेठ परिसरातील जवळपास 60 फुट खोल असलेली व सुमारे तीन मजली पायऱ्यांची गोंडकालीन विहीर स्वच्छ करण्यापासून सुरवात केली आहे. ही विहीर दुर्लक्षित होती. यात कचरा फेकला जात होता. विहिरीच्या भिंतींवर मोठ्या प्रमाणात झाडे उगवली होती. ही झाडे सर्वप्रथम कापण्यात आली. 

उगविलेल्या झाडांमुळे भिंती कमकुवत होऊन प्राचीन वास्तूला धोका निर्माण होण्याची शक्‍यता असते. यावर जाळी लावून कचरा फेकला जाऊ नये याची काळजी घेण्यात येणार आहे. पाहणीदरम्यान मोहिते म्हणाले, या विहिरी केवळ गोंडकालीन जलस्रोतच नाही तर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. नैसर्गिकरीत्या मिळणारे पाणी वाचविणे, त्याचा साठा कसा करावा की ज्यायोगे अडचणींच्या दिवसात ते शिल्लक राहील याची उत्कृष्ट रचना पुरातन काळात आपल्या पूर्वजांनी केली होती. 

या विहिरींच्या रूपात आपल्याला ती बघायला मिळते आहे. आपल्या शहरात अनेक वास्तू ऐतिहासिक आहे. त्या जपल्या जाऊन जलस्तोत्रांचें संवर्धन होणे गरजेचे आहे. याप्रसंगी सहायक आयुक्त विद्या पाटील, इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे,नितीन रामटेके, विवेक पोतनुरवार, अनिरुद्ध राजूरकर, नितीन रामटेके, जयेश बैनलवार, शंकर पोईनकर, सौरभ शेटे, धर्मेंद्र लुनावत, बिमल शहा, अभय अमृतकर, अमोल उत्तलवार, सुनील पाटील, मनीष गावंडे, अरुण गोवारदीपे यांची उपस्थिती होती.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.