तेरवीचा कार्यक्रम भोवला; अपघातात मायलेकीसह वडिलांचा मृत्यू

मेश्राम आणि चुनारकर कुटुंबीय चारचाकी वाहनाने सरडपार येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते
 पिंपळनेरी-खापरी मार्गावर उलटलेले वाहन
पिंपळनेरी-खापरी मार्गावर उलटलेले वाहन पिंपळनेरी-खापरी मार्गावर उलटलेले वाहन
Updated on

चिमूर (जि. चंद्रपूर) : तेरवीच्या कार्यक्रमासाठी जाणारे वाहन पिंपळनेरी-खापरी मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून (Road Accident) उलटले. यात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला, तर वडिलांचा चंद्रपुरात उपचारादरम्यान मृत्यू (Father's death with wife and son) झाला. ही घटना रविवारी (ता. ५) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. सायत्रा मोतीराम मेश्राम (वय ६५, रा. खापरी), कमल चुनारकर (वय ४५, रा. चंद्रपूर) व मोतीराम मेश्राम (वय ७०, रा. खापरी) अशी मृतांची नावे आहेत. या अपघात अन्य दोघे गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.

तालुक्यातील चिमूर-भिसी-उमरेड मार्गावरील खापरी धर्मू येथील मेश्राम आणि चुनारकर कुटुंबीय चारचाकी वाहनाने सरडपार येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. वाहनात सायत्रा मेश्राम, कमल चुनारकर, मोतीराम मेश्राम, उत्तम चुनारकर व अंकित राजू मेश्राम बसले होते. वाहन अक्षय चुनारकर चालवीत होता.

 पिंपळनेरी-खापरी मार्गावर उलटलेले वाहन
लग्नाच्या काऊंटडाऊनमध्ये अंकिता लोखंडेने शेअर केले रोमँटिक फोटो

पिंपळनेरी-खापरी मार्गावरील उमरी फाट्यावर अक्षयचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन उलटले. यात सायत्रा मोतीराम मेश्राम आणि कमल चुनारकर या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला. वडील मोतीराम मेश्राम गंभीर जखमी झाले होते. त्यांना चंद्रपूर येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या अपघात उत्तम चुनारकर (वय ४५, रा. चंद्रपूर) व अंकित राजू मेश्राम (वय १०, रा. खापरी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना चंद्रपुरात रेफर करण्यात आले. अक्षय चुनारकर याला किरकोळ मार लागला. पुढील तपास चिमूर पोलिस तपास ठाणेदार मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय केशव गेडाम करीत आहे. या घटनेने खापरी गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.