Sachin Tendulkar : सचिन तेंडूलकर ताडोबात दाखल

निमढेला कुटीने दिला रोमांचकारी अनुभव, नोंदबुकात केली नोंद
 Tadoba andhari
Tadoba andharisakal
Updated on

चिमूर : भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने भुरळ घातली आहे. त्यामुळे सचिन आपल्या कुटुंबीयासह अधूनमधून, ताडोबात येतो. शनिवारी रात्री उशीरा सचिन व पत्नी अंजली हे दोघेही काही मित्रांसोबत ताडोबात दाखल झाले.

सोमवारी (ता. २०) त्यांनी वन विभागाच्या रामदेगी येथील निमढेला कुटीला भेट दिली. कुटीतील व्यवस्थापन व स्वच्छतेबाबत तेंडूलकर कुटुंबाने आनंद व्यक्त केले व तशी नोंदही निमढेला गेटवरील नोंदबुकात केली.

 Tadoba andhari
Black Fort : धारावीच्या वस्तीत दडलेला काळा किल्ला तूम्ही पाहिलाय का?

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारीचे आकर्षन जंगलप्रेमी पर्यटकांना आहे. दोन दिवसाआंधी सचिन, पत्नी अंजली व मित्र ताडोबा सफारीसाठी दाखल झाले. रविवारी तिसऱ्यांदा सचिनने रामदेगी येथील निमढेला गेटला भेट दिली. यात त्यांनी यावेळच्या ताडोबा भेटी विषयी आनंद व्यक्त केला.

रविवारी सकाळी मदनापूर गेटमधील सफारीत सचिनला तारा वाघिणीसह दोन बछडे, अस्वल-अस्वलीचे दर्शन झाले. दुपारच्या कोलारा गेट मधील सफारीत माया व तिचे बछडे, बिजली, काळा बिबट याचेही दर्शन झाले.

सोमवारी सकाळी त्यांनी अलिझंजा गेटमधून सफारी केली. त्यात त्यांना छोटा मटका, बिबट्याचे दर्शन झाले. यादरम्यान सचिन आणि अंजली यांनी निमढेला गेट येथे भेट देऊन जंगलाच्या उत्कृष्ठ व्यवस्थापनाबद्दल वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. मंगळवारी सचिन आपल्या कुटुंबीयासह मुंबईला रवाना होणार आहे. (tourism)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.