Samruddhi Expressway Accident : दैव बलवत्तर होते म्हणून वाचले मेहकरचे महाजन कुटुंबीय; तीन गायींचा जागीच मृत्यू

समृद्धी वरील अपघातांची मालिका कधी थांबणार?
Samruddhi Expressway Accident
Samruddhi Expressway Accidentsakal
Updated on

मेहकर - समृद्धी महामार्ग हा मृत्युचा सापळा असल्याचा आरोप अनेकदा अनेकांनी केला असतानाही प्रशासन त्याची दखल घेत नाही. दोन दिवसांपूर्वी मेहकरचे सराफा व्यापारी राजन महाजन हे त्यांचा मुलगा आणि मुलीसह वर्धेहून मेहकरकडे जात असताना नांदगाव खंडेश्वरच्या एक्झिट जवळ त्यांच्या कारपुढे अचानक चारपाच गायी आल्या आणि कारची गाईंना धडक बसली. यात तीन गायींचा जागीच मृत्यू झाला.दैव बलवत्तर होते म्हणून महाजन आणि त्यांच्या दोन मुलांना कोणतीही इजा झाली नाही.

गाडीचा वेग नियंत्रित होता, चालक पूर्णपणे शुद्धीवर होता तरीसुद्धा गाई अचानक आल्याने अपघात घडला. तीन निष्पाप गायींचे प्राण गेले. गायींना धडक मारल्यानंतर महाजन यांच्या कारची झालेली अवस्था जिवाचा थरकाप उडविणारी होती. या कारमधील कुणीही वाचले नसावे असे वाटून अंगावर शहारे येतात. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, हेच या घटनेवरून सिद्ध झाले आहे.

असे असले तरी १२० प्रति तास वेग कायद्याने मंजूर असलेल्या या समृद्धी महामार्गावर जनावरे येतातच कशी, यावर कुणाचेच नियंत्रण कसे नाही आणि निष्पाप प्रवाशांचा जीव गेल्यास जबाबदारी कुणाची, या अतिगंभीर प्रश्नांची उत्तरे देणार कोण?

ज्याठिकाणी हा अपघात घडला, त्याठिकाणी समृद्धी महामार्गाला जे लोखंडी कठडे केले आहे आणि जनावरे येऊ नयेत म्हणून प्लॅस्टिकची जाळी बसविली आहे, ती काही कामासाठी बाजूला करण्यात आली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काम पूर्ण झाल्यानंतर कठडा आणि जाळी पूर्ववत होणे अपेक्षित होते.

मात्र, कुणाच्या निष्काळजीपणामुळे हे पूर्ववत झाले नाही, समृद्धी महामार्ग हा प्रगतीचा हायवे मानला जात असला तरी या मार्गाच्या सुरळीत संचालनाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते नेमके करतात काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. विविध अपघातास कारणीभूत ठरणारी जनावरे मार्गावर येणारच नाहीत, याचा बंदोबस्त का केला जात नाही, असा संतप्त सवाल केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.