संग्रामपूर (बुलढाणा) : दसरा सण दोन दिवसांवर असतांना राज्य शासनाने जळगाव जा च्या वैद्यकीय विकासाची साठी मंजूर केलेला निधी मतदार संघा साठी दसरा भेटच म्हणावी लागेल.
आयुर्वेद महाविद्यालय सोबतच संलग्नित 100 खाटांचे रुग्णालय शासन निर्णय क्रमांक ए एमसी-२०२४/ प्र. क्र. 671/24/शिक्षण-1 दिनांक 9 ऑक्टोबर 2024 नुसार मंजूर झाले आहे.
जळगाव जामोद मतदारसंघात वैद्यकीय सेवा व शिक्षणाची पायाभूत सेवा निर्माण व्हावी .म्हणून बऱ्याच दिवसांपासून या भागाचे आमदार डॉ संजय कुटे यांचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार जिल्ह्याचे खासदार आणि देशाचे केंद्रीय आयुष्य व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे मागणी करून मतदार संघात 100 विद्यार्थी संख्येचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न 100 खाटांचे क्षमता असलेले रुग्णालय मंजूर करून घेतले आहे.
नवीन महाविद्यालयासाठी विविध संवर्गातील 127 व वर्ग 4 ची कंत्राटी 71 व इतर 101 अशी एकूण 299 पदे व रुग्णालयाकरिता संवर्गातील 182 व कंत्राटी वर्ग 4 ची 113 व इतर अशी एकूण 297 पदांची नवनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी शासन निर्णयानुसार NCISM मानांकनानुसार पद निर्मिती व बांधकाम यंत्रसामग्री , देखभाल व आवर्ती खर्चालाही एकूण 487.03 कोटी रुपयांच्या भरीव निधीस मान्यता देण्यात आली आहे.
सातपुड्याच्या माध्यमातून नैसर्गिक खनिज संपत्ती व वनौषधीने संपन्न असलेल्या या भागात शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवनिर्मितीने मतदारसंघ रोजगार निर्मिती सोबतच शैक्षणिक व आरोग्य संपन्नतेकडे वाटचाल करत आहे. नवीन आयुर्वेदिक महाविद्यालयास मंजुरात मिळाल्याने मतदारसंघातील जनता वैद्यकीय शिक्षण संपन्नेकडे होत असलेली वाटचाल अनुभवणार आहे.स्वातंत्र्य प्राप्ती नंतर जळगाव जा सारख्या आदिवासी बहुल भागात शासनाचे वैद्यकीय क्षेत्रातील पहिलेच पाऊल असल्याने नागरीक समाधान व्यक्त करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.