Sanjay Rathod Accident: शिंदे गटाच्या पालकमंत्र्यांच्या वाहनाने धडक दिली अन् टेम्पो जाग्यावर झाला पलटी; अपघातानंतर मंत्र्याच्या गाडीची नंबरप्लेट काढली तोडून

Minister Sanjay Rathod Car Accident: 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोहरागड येथे नंगारा म्युझियमचे उद्घाटन होणार आहे.
Sanjay Rathod, Guardian Minister of Yavatmal, involved in car accident
Sanjay Rathod Car Accident|Yavatmal Guardian MinisterEsakal
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या ताफ्यातील वाहनाने एका मिनी टेम्पोला दिलेल्या धडकेमुळे पोहरागडापाशील कोपरा या गावी मोठा अपघात झाला आहे. या अपघातात मिनी टेम्पोचा चालक गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान अपघातानंतर मंत्री संजय राठोड यांच्याच ताफ्यातील वाहनाने यवतमाळ येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

दरम्यान या अपघाताप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. टेम्पोच्या जखमी चालकाला उपचारासाठी पाठवल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांच्या गाडीची नंबरप्लेट तोडून काढल्याचे समोर आले आहे. यासह गाडीवर असलेला सिम्बॉलही हटवण्यात आला आहे. अपघातानंतर पालकमंत्री संजय शिंदे तब्बल साडे तीन तास घटनास्थळी हजर होते.

या अपघातात यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले असून, गाडीचा जागेवरच चुराडा झाला आहे.

Sanjay Rathod, Guardian Minister of Yavatmal, involved in car accident
Viral Video: सिग्नलवर उभ्या दांपत्यावर पोलिसाने थुंकला खर्रा, नंतर काय घडलं? व्हिडिओ व्हायरल...

पंतप्रधानांच्या दौऱ्याची तयारी

दरम्यान 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोहरागड येथे नंगारा म्युझियमचे उद्घाटन होणार आहे.

याची तयारी अंतिम टप्प्यात असताना पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी पालकमंत्री संजय राठोड हे यवतमाळकडे निघाले होते. त्यावेळी दिग्रस ते आर्णी मार्गावरील कोपरा गावात अपघात झाला.

यावेळी रस्त्यावर पडलेल्या केळीची पालकमंत्र्यांनी विल्हेवाट लावली असून, व्यापाऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून रस्त्यावर पडलेली केळी दुसर्‍या वाहनात टाकुन पोहरागड येथे पाठवण्यात आली आहे.

Sanjay Rathod, Guardian Minister of Yavatmal, involved in car accident
Video: फडणवीसांच्या सभेत शिरला साप; भाषण मध्येच थांबवलं अन्....; व्हिडिओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.