संजय राठोड नक्की आहेत कुठे? अखेर उत्तर मिळालं; दोन दिवसांनी 'या' ठिकाणी राहणार उपस्थित  

पोहरा देवी हे वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील गाव आहे. बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर येथे आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरा देवीची ओळख देशभर आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. संजय राठोड दोन दिवसांनी येथे
पोहरा देवी हे वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील गाव आहे. बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर येथे आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरा देवीची ओळख देशभर आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. संजय राठोड दोन दिवसांनी येथे
Updated on

नागपूर ः पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संपूर्ण राज्यभरात राजकारण चांगलंच तापतंय. या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यापासूनच ते कुठे आहेत याबद्दल समाज माध्यमांवर उलट सुलट चर्चा सुरु आहेत. त्यात या प्रकरणात ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यापासून संजय राठोड यांच्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. तर त्यांचा कुठेच पत्ता नाहीये. मात्र आता ते पोहरा देवी इथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

पोहरा देवी हे वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील गाव आहे. बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर येथे आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरा देवीची ओळख देशभर आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. संजय राठोड दोन दिवसांनी येथे येऊन समाजबांधवांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले जात आहे.

बंजारा समाजबांधवांसाठी संजय राठोड हे राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांची राजकीय कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे देशभरातील बंजारा समाजबांधव त्यांच्या सोबत आहेत, असा संदेश पोहरादेवीतून दिला जाणार असल्याचेही सूत्र सांगतात. एक बांधव म्हणून समाजाने त्यांच्या सोबत उभे राहणे समजले जाऊ शकते. पण शिवसेनेने पक्ष म्हणून आणि त्यातही राज्याच्या सत्तेतील प्रमुख पक्ष म्हणून निष्पक्ष भूमिका घेतली पाहिजे, असा विचारप्रवाह पुढे येतो आहे.

प्रकरण 'सेट' करण्याची प्रक्रिया? 

दरम्यान मृत पूजा चव्हाणच्या वडिलांनीही व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज पूजाचा नसल्याचे म्हटले आहे. तिने आर्थिक चणचणीतून हे पाऊल उचलल्याचेही त्यांनी म्हटले. त्यामुळे सामाजिक स्तरावर प्रकरण ‘सेट’ करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगितले जाते आणि मृत पूजाच्या वडिलांच्या वक्तव्यावरून लोकांचा तसा समज होणे स्वाभाविक वाटत असल्याचाही सूर आवळला जातोय. आता कुठे गेले शिवरायांचे विचार, कुठे गेली जिजाऊंची शिकवण, अशीही विचारणा होऊ लागली आहे.

पक्षानं विचारधारा बदलली का? 

मंत्री संजय राठोड यांच्या समाजाचे लोक त्यांच्या सोबत असणे समजण्यासारखे आहे. कारण ते समाजाचे राष्ट्रीय नेते आहेत. पक्ष म्हणून आम्ही राठोडांच्या सोबत असल्याचे संजय राऊत यांनीही सांगितले आहे. पण शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षाने आपल्या पक्षाच्या मंत्र्याच्या बाबतीत विचारधारा बदलविली की काय, असेही प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.