यवतमाळ : दहा लोकांचा बळी घेणारा ‘आरटी-वन’ या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सतत हुलकावणी देणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने दोन पिंजरे लावले आहेत. पिंजऱ्यांमध्ये वनपाल, वनमजुरांना बसविण्यात आल्याची बातमी आली. मात्र, वाघाला जेरबंद करण्यासाठी वन कर्मचाऱ्याला पिंजऱ्यात ठेवण्याचा जो प्रकार झाला, त्याची चुकीची माहिती समोर आल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले आहे.
‘आरटी-वन’ या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने दोन पिंजरे लावले आहेत. पिंजऱ्यांमध्ये वनपाल, वनमजुरांना बसविले आहे. दुसऱ्या पिंजऱ्याची दोरी वनमजुरांच्या हातात आहे. वाघ पिंजऱ्याच्या आत घुसताच दोरी ओढून दरवाजा बंद होईल. यात वनपाल, वनरक्षकांच्या जिवाला धोका नाही, असे वनविभागाकडून सांगितले आले होते.
नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी एका पिंजऱ्यात बकरी किंवा त्याचे भक्ष ठेवले आहे. दुसऱ्या पिंजऱ्यात कर्मचारी वाघाला बेशुद्ध करण्यासाठी आहेत, असे संजय राठोड यांनी सांगितले. वाघाला लांबून डॉट मारता येत नाही. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा येथील नरभक्षक वाघाला सुरक्षित जेरबंद करण्यासाठी, डॉट मारण्यासाठी वन कर्मचारी त्या दुसऱ्या पिंजऱ्यात आहेत, असे संजय राठोड यांनी एका वृत्त वाहिणीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
जेव्हा तो वाघ त्याचे भक्ष खाण्यासाठी येईल, त्यावेळी बेशुद्ध करण्यासाठी पिंजऱ्यात वन कर्मचारी आहेत. ही त्या मागची भूमिका आहे, असे संजय राठोड यांनी सांगितले. मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाघ वाचले पाहिजे, वनांचे संरक्षण झाले पाहिजे, असेही वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
मुख्य पिंजऱ्याच्या दरवाजाला बांधलेली दोरी दुसऱ्या पिंजऱ्यात बसलेल्या वनकर्मचाऱ्यांचा हातात आहे. मुख्य पिंजऱ्यात वाघ येताच ही दोरी ओढली जाईल. दरवाजा बंद होऊन वाघ अडकेल. या योजनेत पिंजऱ्यात बसलेल्या वनकर्मचाऱ्याच्या जिवाला कुठलाच धोका नाही. मात्र, याची चुकीची माहिती समोर आल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले आहे.
राजुरा तालुक्यात धुमाकूळ घालणारा ‘आरटी-वन’ वाघाने आतापर्यंत दहा जणांचे बळी घेतले आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी १६० सीसीटीव्ही जंगलात लावण्यात आले आहेत. दोनशे वनकर्मचाऱ्यांचा ताफा जंगलात गस्तीवर आहे. वाघाला बेशुद्ध करण्यासाठी दोन शूटर तैनात आहेत. दिवसरात्र वन कर्मचारी वाघावर लक्ष ठेवून आहेत. मात्र, प्रत्येक वेळी वाघ हुलकावणी देत आहे. वनविभागाने वाघाला आकर्षित करण्यासाठी पिंजऱ्यात जनावर ठेवली. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही.
वनविभागावर दबाव वाढला
वाघाला ठार करा, अशी मागणी लोकप्रतिनीधींनीकडून होत आहे. वाघाच्या बंदोबस्त करा, या मागणीला घेऊन शेतकरी, शेतमजुरांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे वनविभागावर दबाव वाढला आहे. यातूनच वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावले आहेत. यातील एक पिंजरा वाघाला पकडण्यासाठी आहे. या पिंजऱ्यापासून ३० ते ४० मीटर अंतरावर उंच ठिकाणी दुसरा पिंजरा लावला आहे. या पिंजऱ्यात आळीपाळीने सोळा वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर बसणार आहेत.
लांबून डॉट मरता येत नाही
चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा येथील नरभक्षक वाघाला सुरक्षित जेरबंद करण्यासाठी, डॉट मारण्यासाठी वन कर्मचारी दुसऱ्या पिंजऱ्यात आहेत. वाघाला लांबून डॉट मारता येत नाही.
- संजय राठोड,
वनमंत्री
संकलन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.