Navratri : मालेगावचे जागृत संतोषी माता देवस्थान

५६ वर्षापूर्वीचे जुने मंदिर : दुर्गा उत्सवात भाविकांची अलोट गर्दी
Navratri
Navratrisakal
Updated on

वाशीम : नवरात्रामध्ये नऊ दिवस भाविक भक्त देवीला नवस करुन मनोकामना मागतात. हे नऊ दिवस विविध देवस्थाने भक्तीने ओसंडून वाहत असतात. जिल्ह्यात अनेक प्रसिध्द देवस्थाने आहेत. जेथे नवरात्रीच्या नऊ दिवसाव्यतीरिक्त नेहमी भाविकांची गर्दी असते.

यामध्ये जिल्ह्यातील मालेगाव येथील शेलु फाट्यावरील संतोषीमाता नगरात असलेले श्री संतोषीमाता देवस्थानाचे पंचक्रोशित आगळेवेगळे भक्तीमय स्थान आहे. ५६ वर्ष जुने असलेले हे देवस्थान नोंदणीकृत असून येथील देवीची भक्ती करुन मनोभावे मनोकामना मागितल्यास देवी नक्कीच नवसाला पावते अशी या देवीची महिमा आहे.

येथे वर्षभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. येथे संतोषीमाता बरोबरच दुर्गामाता, भवानीमाता, रेणूकामाता, गजानन बाबा, साईबाबा, महादेव, बाबा रामदेवजी यांचे सुद्धा मंदिर आहेत. नवरात्रात मंदिरावर दर्शनासाठी भाविकांची दरवर्षीप्रमाणे यंदाही रीघ लागत आहे. संतोषी माता संस्थान परिसरात जागृत देवस्थान म्हणून ख्यातीप्राप्त आहे.

देवस्थान मंडळाच्या वतीने येथे वर्षभर अनेक धार्मिक कार्यक्रम राबविले जातात. या कार्यक्रमामध्ये परिसरातील भाविक भक्त उत्साहात भाग घेतात. नवरात्रीमध्ये या ठिकाणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तेजस मिश्रा यांच्या हस्ते संतोषीमाता व दुर्गामातेच्या मूर्तीची पूजाअर्चा करून घटस्थापना करण्यात आली.

या देवीची धार्मिक पुजाअर्चना मिश्रा परिवारातील सर्व सदस्य आनंदाने व भक्तीमय वातावरणात पार पाडतात. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या श्री संतोषीमाता देवीच्या दर्शनाचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष तेजस मिश्रा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.