Gondia Accident : शिरोली महागावजवळील घटना, स्कूल बस-दुचाकीची धडक पतीचा मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

शिरोली महागावजवळील राधिका पेट्रोलपंपासमोर स्कूल बस आणि दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू; तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली.
school bus-bicycle accident husband killed Wife injured gondia
school bus-bicycle accident husband killed Wife injured gondiaSakal
Updated on

अर्जुनी मोरगाव : शिरोली महागावजवळील राधिका पेट्रोलपंपासमोर स्कूल बस आणि दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू; तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना गुरुवारी (ता. १८) सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली. हरिदास वासुदेव कोहरे (वय ४५) असे मृताचे, तर इंदू हरिदास कोहरे (वय ४०, दोघेही रा. महागाव शिरोली) असे जखमीचे नाव आहे. हरिदास कोहरे हे येथील वीज वितरण कंपनीत कार्यरत होते.

हरिदास कोहरे व त्यांची पत्नी इंदू कोहरे हे दुचाकीने (एमएच ३५/ टी. ८००६) अर्जुनी मोरगावकडून खरीप हंगामातील भातपीक लागवडीकरिता महागाव येथील आपल्या शेतात जात होते. तसेच महागाव शिरोली येथून विद्यार्थी घेऊन सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगावची स्कूल बस (एमएच ३५/ए. जे. ३६३४) अर्जुनी मोरगावकडे येत होती.

स्कूल बसचालक कुंडलिक बावनकर (रा. माहुरकुडा) हा विद्यार्थी घेऊन येत होता. राधिका पेट्रोलपंपासमोर या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीचालक हरिदास कोहरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी इंदूबाई कोहरे गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. या घटनेची नोंद पोलिसांनी केली असून, आरोपी स्कूल बसचालक कुंडलिक बावनकर याला अटक केली आहे. पुढील तपास एपीआय शेंडे करीत आहेत.

विद्यार्थ्यांनी धरली घराची वाट

घटनेनंतर भयभित झालेल्या विद्यार्थ्यांनी स्कूलबसमधून उतरत थेट घराची वाट धरली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जखमीला पोलिस आणि नागरिकांनी मदतीचा हात देत रुग्णालयात हलविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.