महाराष्ट्रातील सर्व शाळांना सुट्टी असूनही आज सुरू राहणार

गावात भागवत सप्ताह झाला की शेवटच्या दिवशी महाप्रसाद होतोच.त्याच धर्तीवर शाळांमध्ये तिथी भोजन होणार आहे.
schools will open today despite holiday for eating together
schools will open today despite holiday for eating togethersakal
Updated on

- अविनाश साबापुरे

यवतमाळ : पावसाचा माहौल अन् रविवारची सुटी एकत्र आल्याने बच्चे मंडळी आनंदात आहे. पण यावेळचा रविवार वेगळा आहे. रविवारी (ता.२८) महाराष्ट्रातील सर्व शाळा सुटी असूनही सुरू राहणार आहेत. पण यावेळी अध्यापन-अध्ययन होणार नाही, तर होईल भोजनावळी.

होय, गेल्या २२ जुलैपासून सर्वच शाळांमध्ये ‘शिक्षण सप्ताह’ राबविला जात आहे. या सप्ताहाचा समारोप रविवारी अनोख्या पद्धतीने केला जाणार आहे. गावात भागवत सप्ताह झाला की शेवटच्या दिवशी महाप्रसाद होतोच.त्याच धर्तीवर शाळांमध्ये तिथी भोजन होणार आहे.यावेळी विद्यार्थ्यांसोबतच गावकरी आणि मान्यवरांना निमंत्रित करुन ‘समुदाय सहभाग’ उपक्रम तडीस नेला जाणार आहे.

गावकऱ्यांनी यावे, शाळा पाहावी, शाळेच्या गरजा ओळखाव्या आणि शाळेसाठी पदरमोड करुन योगदान द्यावे, असा यामागे उद्देश आहे. या योगदानाची नोंद केंद्र सरकारच्या ‘विद्यांजली’ पोर्टलवरही होणार आहे. परंतु, या सोहळ्यासाठी रविवारीही शाळा उघडावी लागेल म्हणून अनेक शिक्षक त्रस्त झालेले आहेत. तर बच्चे कंपनी मात्र सुट्टीच्या दिवशी शाळेत ‘स्पेशल’ जेवायलाच जायचे, या आनंदात आहे.

दोन कोटी पोरांसह गावकऱ्यांनाही आवतन

महाराष्ट्रातील पहिली ते बारावीच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये समुदाय सहभागाचा उपक्रम राबविला जाणार आहे.शासकीय शाळांमध्ये ५२ लाख २६ हजार ८७४, अनुदानित शाळांमध्ये ९७ लाख ६९ हजार २०२, विनाअनुदानित शाळांमध्ये ६२ लाख ६१ हजार ७७८ विद्यार्थी आहेत.अशा प्रकारे एकूण दोन कोटी १२ लाख ५७ हजार ८५४ विद्यार्थ्यांसह गावकरी व अन्य मान्यवरांनाही रविवारच्या उपक्रमात निमंत्रित केले जाणार आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांचे भावनिक आवाहन

पावसाळा सुरू असतानाही सर्व शाळांनी शिक्षण सप्ताहात रोज वेगवेगळे उपक्रम उत्साहाने पूर्णत्वास नेले, याबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राऊत यांनी भावनिक पत्र शाळांना पाठविले आहे. ज्या उत्साहाने हा सप्ताह साजरा केला, त्याच उत्साहाने समारोपही गोड करावा, असे भावनिक आवाहन त्यांनी शाळांना केले आहे.

दानशूर व्यक्तींनी शाळेच्या गरजा ओळखून शाळेला मदत करावी, असा या समुदाय सहभाग उपक्रमाचा उद्देश आहे. त्या मदतीची नोंद विद्यांजली पोर्टलवर होईल. सकाळी सर्व शाळांमध्ये भोजनाचा कार्यक्रम असेल.

- डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.