किन्हवली - मागील पाच वर्षांपूर्वी वचननामाच्या माध्यमातून मतदारांना दिलेल्या अनेक आश्वासनांची आमदारकीच्या कार्यकाळात पूर्तता केली नसतानाही यंदाच्या वचननाम्यात अनेक आश्वासनांची खैरात केली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरोधात अटीतटीच्या लढतीत निवडून आलेल्या आमदार दौलत दरोडाना पाच वर्षांच्या कारकिर्दीत शहापूर तालुक्यातील विकासाच्या अनेक आव्हानांचा डोंगर सर करावा लागणार आहे.