Shegaon : दिवाळी निमित्त असलेल्या सलग सुट्ट्यामुळे संतनगरी शेगाव मध्ये येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांची गर्दी पाहायला मिळणार आहे.
दरवर्षी दिवाळीनंतर संतनगरी शेगाव येथे श्रींचे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भावीक भक्त येत असतात. दीपावली पाडवा पार पडला की, शेगावकडे सर्व भक्त आतुरतेने येतात. शेगाव शहरांमध्ये मंदिरात दर्शन घेऊन येथे मुक्कामी राहतात. त्यामुळं काही वेळेस श्री संस्थांनची मुबलक असलेली निवास व्यवस्थापण हाउसफुल होऊन जाते. भाविकांचे गर्दीमुळे मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.