Shegaon News : संत नगरीत अनैतिक देह व्यापारवर पोलिसांचा छापा; पिडीत महिलांची सुटका, तर चार युवक ताब्यात

गेल्या काही महिन्यांपासून शेगाव शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय तसेच देह व्यापार मध्ये वाढ झाली आहे.
Crime
Crimesakal
Updated on

शेगाव - गेल्या काही महिन्यांपासून शेगाव शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय तसेच देह व्यापार मध्ये वाढ झाली आहे. यामध्ये नवतारुण्य युवकांचा सहभाग असल्याने तरुण पिढी बरबादिच्या मार्गावर आहे. संत नगरीमध्ये भक्तीच्या नावावर येणारे तरुण तरुणी कडून असे कृत्य म्हणजे सामाजिक दृष्टीने विघातकपणा म्हणावा लागेल. काही अपवाद वगळता शहरातील बहुतांश गेस्ट हाऊस लॉजेस मध्ये अनैतिक देह व्यापार चालवण्यात येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

आठ मे रोजी येथून बाळापुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वनविहार ढाब्यामागे सुरू असलेल्या एका हिरव्या नेटचे कंपाउंड असलेल्या ठिकाणी स्थानीय गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून अनैतिक देह व्यापार करणाऱ्या पीडित महिलांसह चार युवकांना ताब्यात घेतले.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी पक्कासह आनंद सागर समोर ध्वनी विहार ढाब्याचे मागे असलेल्या हिरवे नेटचे कंपाउड लावलेले ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आठ मे रोजी दुपारी छापा टाकला. त्यामध्ये प्रेम गणेश लहाने (वय-20 वर्ष) रा. ग्राम जवळा, ता. शेगाव, सुरज चिंचोलकार रा शेगाव, अमोल प्रकाश बांगर (वय-21 वर्ष) रा. बावनबीर, ता. संग्रामपुर, सुमीत सखाराम जाधव (वय-21 वर्ष) रा. रामदेवबाबा नगर, शेगाव, सागर अनिल सारवान (वय-19 वर्ष) रा. रामदेवबाबा नगर, शेगाव यानी स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता सुटका केलेल्या पिडीत महीलाना पैशाचे प्रलोभन देवुन देहव्यापार करण्यास प्रवृत्त करून त्यांना शेगाव येथे बोलावुन त्यांचेकडून, देह व्यापार करून घेतला.

आरोपीचे ताब्यात 1,23,690/-रू. मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे. अशा फिर्याद वरून शहर पोलिसांनी कलम ४,५,६ अनैतिक व्यापार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे शेगाव शहर ठाणेदार करत आहे.

शहरात दररोज राज्यभरातून हजारो भाविक तसेच काही आंबट शौकीन येत असतात. शहरातील विविध शहरातील विविध गेस्ट हाऊस, लॉजेस तसेच काही ठिकाणी अशा प्रकारची कारवाई पोलिसांकडून वारंवार करण्यात आलेली आहे. मात्र तरीही शहरात वेश्याव्यवसाय आटोक्यात आलेला नाही.

त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शेगाव येथे लक्ष केंद्रित करून दरमहा अशा प्रकारच्या मोठमोठ्या कारवाया करून संबंधितांना कार्यवाही करावी, जेणेकरून संतनगरी शेगावला अशा प्रकारच्या अनैतिक देह व्यापारामुळे गालबोट लागणार नाही. अशी रास्त अपेक्षा शहरवासीयांसह अनेकांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.