Sindkhed Raja Vishnu Murti : शेषशायी विष्णू मूर्ती सिंदखेड राजा येथेच राहणार; भारतीय पुरातत्व विभागाने केले स्पष्ट

Sindkhed Raja Vishnu Murti : भारतीय पुरातत्व विभागातर्फे राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी जवळील शिव मंदिराचे उत्खनन सुरू आहे.
 sheshashayi vishnu statue found in buldhana
sheshashayi vishnu statue found in buldhana
Updated on

सिंदखेड राजा : सिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी जवळील शिव मंदिराच्या उत्खननात शेषशायी विष्णूची मूर्ती आढळली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मानकानुसार उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येत असल्याने शेषशायी विष्णूची मूर्ती सिंदखेड राजा येथेच राहणार आहे,अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक अरुण मलिक यांनी दिली.

भारतीय पुरातत्व विभागातर्फे राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी जवळील शिव मंदिराचे उत्खनन सुरू आहे. मागील आठवड्यात उत्खननाचे काम सुरू असताना सव्वा मीटर खोलीवर भव्य शेषशायी विष्णूची मूर्ती आढळून आली आहे. ही मूर्ती साधारणतः अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असण्याचा अंदाज आहे.

भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वसाधारण मानकानुसार उत्खननात सापडलेल्या सर्व वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येतात. भारतीय पुरातत्व विभागाच्या ४९ कार्य ठिकाणी याच पद्धतीने पुरातन वस्तू आणि अवशेषांचे जतन करण्यात आले आहे. याच नियमानुसार सिंदखेड राजा येथे आढळलेली शेषशायी विष्णू मूर्ती सिंदखेड राजा येथेच जतन केल्या जातील.

 sheshashayi vishnu statue found in buldhana
Pune Drugs Case : ‘त्या’ तिघांनी रात्रीत उधळले ८५ हजार! फर्ग्युसन रोडवरील एल थ्रीममधील प्रकार; पार्टीमध्ये अल्पवयीन मुले?

राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी स्थळाच्या परिसरातच ही मूर्ती सुव्यवस्थितरित्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल. ही मूर्ती याच परिसरात ठेवण्यासाठी आधी व्यवस्था करण्यात येईल. त्यानंतरच ही मूर्ती हलवण्यात येईल. सध्या ही मूर्ती उत्खनन करून सुव्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. शिव मंदिरामध्ये ही मूर्ती दबल्या गेल्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक या मूर्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ही मूर्ती कोणत्या शैलीतील आहे, याबाबत अधिक माहिती होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.येत्या एका आठवड्यामध्ये या मूर्तीबाबत संशोधन होऊन अधिकची माहिती प्राप्त होईल.सध्या स्थितीमध्ये मूर्तीचे काळजीपूर्वक हाताळणे आणि योग्य ठिकाणी हलवण्याची व्यवस्था प्राधान्याने करण्यात येणार आहे, अशी माहितीही अरुण मलिक यांनी दिली.

 sheshashayi vishnu statue found in buldhana
Viral Video: संसदेत राडा! 'जय हिंदू राष्ट्र...' म्हणत भाजप खासदाराने संपवली शपथ, पाहा व्हिडिओ

शेषशायी विष्णू मूर्तीचे वैशिष्ट्य

शेषशायी विष्णू मूर्ती ही दीड मीटर बाय सव्वा मीटर आकाराच्या दगडामध्ये कोरल्या गेलेली आहे.समुद्रमंथन आणि दशावतार यांचे अद्भुत कोरीव काम या मूर्तीमध्ये करण्यात आलेले आहे.ही मूर्ती क्लोरियट दगडामध्ये कोरल्या गेलेली आहे.साधारणतः हा दगड दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आढळून येतो.या दगडावर बारीक कोरीव काम करणे शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.