देवरी पोलाद कारखान्यामुळे वाढले वायू अन् ध्वनिप्रदूषण, बंद करण्याची सेनेची मागणी

shivsena demand to closed steel factory in deori midc of gondia
shivsena demand to closed steel factory in deori midc of gondia
Updated on

देवरी ( जि. गोंदिया ) : जिल्ह्यातील आदिवासी नक्षलग्रस्त व अतिदुर्गम तालुका देवरी येथील एमआयडीसी मध्ये ग्राझिया टूलिया लाइफस्टाईल हा पोलाद कारखाना सुरू करण्यात आला. मात्र, वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदुषणामुळे कारखान्यालगत असलेल्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. याप्रकरणी कारखान्याच्या वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषणाची सखोल चौकशी करून हा कारखाना स्थलांतरीत करण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले.

एमआयडीसीमध्ये पोलाद कारखाना सुरू होण्यापूर्वी या परिसरात शाळा, महाविद्यालय आणि लोकवस्ती आहे. या शाळेत जवळपास ५ ते ७ हजाराच्या जवळपास विद्यार्थी आहेत. देवरीच्या एमआयडीसीमध्ये खूप जागा खाली असूनही शाळा, महाविद्यालय व लोकवस्ती असलेल्या ठिकाणीच असा जीवघेणा कारखाना सुरू करण्याची परवानगी कशी देण्यात आली? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. कारखान्यात सुरक्षिततेची सुद्धा पूर्ण व्यवस्था नाही. 

काही महिन्यांपूर्वीच कारखान्यात मोठा स्फोट झाला होता. या घटनेत दोन मजूर कामगारांचा मृत्यू झाला होता, तर पाच कामगार गंभीर झाले होते. या पोलाद कारखान्यापासून निघणारा धूर तसेच ध्वनिप्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच भविष्यात या कारखान्यात मोठा स्फोट होण्याची शक्यत नाकारता येत नाही. त्यामुळे शाळा आणि परिसरातील लोकांचे नुकसान होईल, असेही निवेदनात म्हटले आहे. तसेच निवेदनाची प्रतिलिपी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नागपूरचे प्रादेशिक अधिकारी आणि पर्यावरण कार्यालय नागपूरचे प्रादेशिक अधिकारी यांनाही पाठविण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख नीलेश धुमाड, जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, जिल्हा समन्वयक पंकज यादव, देवरी तालुका प्रमुख सुनील मिश्रा, शहरप्रमुख राजा भाटिया, शिक्षक सेनेचे देवरी तालुका अध्यक्ष अनिल कुर्वे, शहराध्यक्ष सुभाष दुबे आदिंचा यात समावेश होता.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.