'ही भाजपची नौटंकी'; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

'ही भाजपची नौटंकी'; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप
Updated on

अमरावती : हिंदू स्मशानभूमीत (Hindu crematorium) लावण्यात येणाऱ्या तिसऱ्या गॅस दाहीनीच्या (Gas crematorium) मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. तिसऱ्या गॅस दाहिनीला विरोध करणे म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या (BJP) काही पदाधिकाऱ्यांची नौटंकी असल्याचा आरोप शिवसेनेचे (Shivsena) महानगरप्रमुख पराग गुडधे यांनी केला आहे. (shivsena leader criticized BJP over gas crematorium)

'ही भाजपची नौटंकी'; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप
एसटी प्रवाशांनो, आता होणार ॲन्टीजेन टेस्ट

पराग गुडधे म्हणाले, भाजपचेच आमदार प्रवीण पोटे यांनी गॅसदाहिनीसाठी 30 लाख रुपयांचा निधी दिला असून त्यातून नवीन दाहिनी खरेदी करण्यात आली आहे. भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांनी ती हिंदू ूस्मशानभूमीत कुठे लावली पाहिजे याचे निरीक्षण येथे जाऊन केले तर काही पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला आहे.

भाजपतील अंतर्गत गटबाजीच्या नाटकाचा हा अंक आता अमरावतीकरांना पाहायला मिळत आहे, असा आरोप त्यांनी केला. भाजपचे काही पदाधिकारी गॅसदाहिनीच्या मुद्यावरून प्रशासनाकडे बोट दाखवीत आहेत. वास्तविक त्यांनी आमदार पोटे तसेच महापौरांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढायला हवा, मात्र तसे न करता परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन आंदोलनाची नौटंकी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

'ही भाजपची नौटंकी'; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप
स्मशानभूमीतील गॅस दाहिनीची तोडफोड करण्याचा प्रयत्न

भाजपचे एक आमदार निधी देत आहे, काही पदाधिकारी त्याला विरोध करीत आहेत, महापालिकेत सत्तारूढ पक्षाचे महापौर चुप्पी साधून आहे, हा सर्व खेळ नागरिकांना दिसत आहे. गॅसदाहिनीला विरोध असणाऱ्यांनी आधी आमदार प्रवीण पोटे तसेच महापौरांशी याविषयावर बोलावे. महापौरांना एक स्मशानभूमीही विकसित करता आली नाही, असा आरोपही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

(shivsena leader criticized BJP over gas crematorium)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()