Shivsena : ठाकरेंचा आणखी एक मावळा भाजपच्या गोटात; विदर्भात खिंडार

वानखडे यांना आतापर्यंत एक कट्टर शिवसैनिक आणि मातोश्रीशी एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते मानले जात होते
Bjp shivsena
Bjp shivsenaSakal
Updated on

Amravati Rajesh Wankhede News : सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरेंच्या अडचणी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येत आहेत. एकीकडे खरी शिवसेना कुणाची यावर सुप्रीम कोर्टात वाद सुरू असतानाचा ठाकरेंना अमरावतीमध्ये मोठा झटका बसला आहे. अमरावतीचे जिल्हाप्रुमख राजेश वानखेडे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे एकीकडे पक्षाला बळ द्यायचं की शिवसैनिकांना पक्षांतरापासून वाचलायचं अशी द्विधा परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्या समोर उभी ठाकली आहे.

Bjp shivsena
Nitin Gadkari: रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये ओणवं उभं करा; मनसे आमदाराचा गडकरींना टोला

जिल्हाप्रमुख राजेश वानखडे भाजपमध्ये प्रवेश करणार असून, वानखेडेंचा भाजप प्रवेश म्हणचे अमरावतीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वानखेडे आज भाजपात प्रवेश करणार आहेत. वानखेडेंच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढणार असल्याने शिवसेनेसाठी ही डोकेदुखी ठरणार आहे. वानखडेंनी तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

Bjp shivsena
Vishwajeet Kadam : काठावरच्या विश्वजीत कदमांना थोरांताचा सल्ला; म्हणाले...

वानखडे यांना आतापर्यंत एक कट्टर शिवसैनिक आणि मातोश्रीशी एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते मानले जात होते; परंतु राज्यातील सत्तासंघर्षानंतर सध्याची परिस्थिती लक्षात घेता वानखेडेंनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.