सहा दिवसांच्या दिलाशानंतर पॉझिटिव्ह अहवालाने धक्का

66.jpg
66.jpg
Updated on

अकोला  ः मागील सहा दिवसांपासून एकही पॉझिटिव्ह रुग्ण न आढळणाऱ्या अकोला शहरात रविवारी (ता.२६) एका जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे अकोल्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रविवारी दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे 12 अहवाल प्राप्त झाले. त्यातील एक रुग्ण पॉझिटीव्ह असून, उरलेले सर्व 11 निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा शहरातील सिंधी कॅम्प भागातील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान रुग्ण ज्या भागातील आहे तो सिंधी कॅम्प व पक्की खोली परिसर प्रतिबंधित केल्याचे, आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी जारी केले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण 539 नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 536 अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण 519 अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत व तीन अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत एकूण 539 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 419, फेरतपासणीचे 82 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 38 नमुने होते. आजपर्यंत एकूण 536 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 416 तर फेरतपासणीचे 82 व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 38 अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 519 आहे. रविवारी प्राप्त झालेल्या 12 अहवालात एक पॉझिटीव्ह तर 11 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात तीन अहवाल प्रलंबित असून, ते तिनही अहवाल प्राथमिक आहेत. जिल्ह्यात आजअखेर बाहेरुन आलेल्या 562 प्रवाश्यांपैकी 222 जण गृह अलगीकरणात तर 78 जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण 300 जण अलगीकरणात आहेत. 240 जणांची अलगीकरणाची 14 दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

पहिल्या रुग्णांचा सहावा अहवाल निगेटिव्ह
रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच बैदपुरा भागातील रहिवासी असलेला जिल्ह्यातील पहिल्या रुग्णाचा पाचवा व सहावा तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत देण्यात आली आहे. त्यामुळे उपचार करणाऱ्या यंत्रणेस काहीसा दिलासा मिळाला आहे.

सिंधी कॅम्प परिसर प्रतिबंधित
पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा सिंधी कॅम्प भागातील पक्की खोली परिसरातील रहिवासी असल्याने आता सिंधी कॅम्प व पक्की खोली परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी रविवारी जारी केले आहेत. आता या भागातील रहिवासी बाहेरील भागात व बाहेरील व्यक्ती या भागात जाऊ अथवा येऊ शकणार नाहीत. या भागातील प्रत्येक घरी जाऊन आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच या व्यक्तीच्या संपर्कांचाही तपास करण्याचे काम सुरु झाले आहे.

नागरिकांनो घरातच थांबा
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. आजाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास ती लपवू नका. तत्काळ डॉक्टरांना वा शासकीय रुग्णालयात दाखवा. लक्षणे लपवून राहू नका. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नका. बाहेर पडतांना मास्क लावा. कोणाही व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवा. घरी आल्यावर साबणाने हात धुवा. स्वच्छता राखा असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.

रुग्णसंख्या आठवर
जिल्ह्यात आता एकूण कोवीडबाधीत रुग्णसंख्या 17 झाली आहे. त्यातील दोघे मयत झाले. 23 एप्रिल रोजी सात जणांना घरी सोडण्यात आले. रविवारी एकाच्या पॉझिटीव्ह अहवालाची भर पडल्यामुळे आता आजअखेर आठ रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे. उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

अशी आहे आजची स्थिती
तपासणीसाठी पाठविलेले नमुने-539
प्राप्त अहवाल- 536
पॉझीटिव्ह-8
निगेटीव्ह-519
प्रलंबित-3
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.