पाणीपुरीत पूर्ण केला शॉर्ट टर्म अभ्यासक्रम; एकाच छताखाली १५ स्वाद; एमबीए झालेल्या अक्षयचे अनोखे स्टार्टअप

Short term course completed in Panipuri 15 flavors under one roof
Short term course completed in Panipuri 15 flavors under one roof
Updated on

अमरावती : पाणीपुरी किंवा इतर फास्टफूडचा व्यवसाय म्हटलं की डोळ्यासमोर येतो नॉर्थ इंडियन किंवा साउथ इंडियन व्यक्ती. मराठी माणूस या व्यवसायात विकास करू शकत नाही हे लहान पणापासून आपल्या कानावर पडलेले वाक्य. मात्र, परंपरागत शेती व्यवसाय असलेल्या व पिढीजात वारकरी होले कुटुंबातात जन्मलेला अक्षय याने शेती न करता बी.एस.सी (कॅम्प्युटर) व एम बी ए शिक्षण घेऊन व्यवसाय करण्याचा चंग बांधला. तब्बल वर्षभर विविध व्यवसायांचा अभ्यास करून खाद्य पदार्थाचा व्यवसाय टाकण्याचा निर्धार केला. मग काय एम बी ए झालेल्या अक्षयचे अनोखे स्टार्टअप सुरू केले.

अक्षयला पाणीपुरी खायला आवडते. पाच वर्षांपासून मामाकडे शिक्षण घेताना अमरावती येथे वास्तव्य होते. याच काळात बडनेरा ते राजकमल चौकापर्यंत अशी एकही गाडी नव्हती जिथे अक्षयने पाणीपुरी खाली नाही किंवा तो गाडीवाला अक्षयला ग्राहक म्हणून ओळखत नाही. त्याची हीच आवड त्याचा व्यवसाय बनेल याची कल्पना खुद्द अक्षयला सुद्धा नव्हती. जेव्हा व्यवसाय करायचे पक्के झाले तेव्हाच पाणीपुरीचा व्यवसाय टाकण्याचे अक्षयने निश्चित केले होते.

एखादी गाडी घेऊन व्यवसाय टाकण्यापेक्षा सर्वच स्तरातील खवय्ये लोकांची तृष्णातृप्ती पूर्ण व्हावी म्हणून क्वांटीटी सोबत क्वालिटी वर भर देण्याचा मानस होता. अमरावती व इतर शहरातील व्यावसायिकांची भेट घेत सखोल अभ्यास केला. तदनंतर अहमदाबाद (गुजरात) येथे जाऊन तब्बल सहा महिने या व्यवसायाचा शॉर्ट टर्म अभ्यासक्रम पूर्ण केला. केवळ एकाच चवीचा आधार न घेता ग्राहकांना विविध चवी कशा देता देईल याचा अभ्यास केला. 

अमरावतीमधील खवय्येगीरीला राज्यात तोड नाही. म्हणून तर शहरात फास्टफूड गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीवर आहे. यात खवय्ये लोकांचे सुद्धा वेगवेगळे क्लास आहेत. म्हणून खवय्येगीरीतील टॉप क्लास लोकांच्या इच्छापूर्तीसाठी अमरावतीमध्ये प्रथमच ब्रांडेड ‘सफल’ हायजिनिक पाणीपुरी लॉंच करण्यात आली आहे. एकाच छताखाली ऑटोमेटिक पाणीपुरी मशीनद्वारा तुम्हाला पंधरा वेगवेगळ्या चवीमध्ये पाणीपुरी चाखायला मिळते. राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळे स्वाद चाखायला मिळेल पण एकाच ठिकाणी १५ स्वाद कुठेच मिळणार नाही.

चाळीस रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी

पाणीपुरी म्हटले की केवळ एका प्लेटमध्ये समाधान होत नाही. चांगली पाणीपुरी खातो म्हटले तर १५ ते २० रुपयात केवळ सहा नग मिळतात. मात्र, ‘सफल’मध्ये केवळ ४० रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी मिळते. शिवाय पुदिना, खट्टा मिठा, जलजीरा, चायनीज, टोमॅटो, लसूण, अद्रक, निंबू, चॉकलेट, पिझ्झा, फायर, भेल, शेव, दही पाणीपुरीसह स्वतंत्र भेल आदी पंधरा निरनिराळ्या चव येथे चाखायला मिळत आहेत.

व्यवसाय एक रोजगार अनेक

अक्षयने सुरू केलेला पाणीपुरीचा व्यवसाय जरी एक असला तरी अनेकांना रोजगार देणारा ठरला आहे. स्वतः अक्षयसह दुकानात चार व्यक्ती व घरी पुरी करण्यासाठी दोन व्यक्ती तसेच पुरीचा होम डिलीव्हरी करणारा एक व्यक्ती अशा ७ ते ८ व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. लवकरच यवतमाळ येथेही त्याचा मित्र दुसरी शाखा उघडणार असल्याचे अक्षयने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.