सिंदखेड राजा : विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत नगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज बुलडाणा जिल्हात आगमन झाले. दिंडीचे टाळ-मृदुंगाच्या तालात आणि गण गण गणात बोतेच्या जयघोषात विदर्भ-मराठवाड्याच्या हद्दीमध्ये हजारो नागरिकांच्या उपस्थिती श्रींच्या पालखीचे आगमन दुपारी २ वाजता झाले.
यावेळी फटाक्याची आतषबाजी करून भाविकांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. मातृतिर्थ सिंदखेडराजा शहरातील श्री रामेश्वर मंदिर येथे ''श्री''च्या पालखीचे आगमन होताच भाविकांची गर्दी केली.
''श्री'' ची पालखी स्वगृही परतली असल्याचा आनंद पालखीमधील वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पहायला मिळत होता. २४ जुलै रोजी श्री. संत गजानन महाराज यांची पालखी शेगावला पोहचणार आहे. हजारो भक्तांच्या व प्रशासनाच्या वतीने भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावर्षी पालखीचे हे ५४ वे वर्ष आहे. ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले.
पालखी सोहळ्याचे ५४ वे वर्ष
श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे यावर्षी ५४ वे वर्ष आहे.मागील ५३ वर्षापासून ''श्री'' ची पालखी अविरतपणे शेगाव ते पंढरपूर व पंढरपूर ते शेगाव सुरूच आहे. वारकरी सुद्धा मोठ्या आनंदाने पालखीमध्ये सहभागी होत असतात.
७०० वारकरी अन् १३०० कि. मी. चा प्रवास
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखला जाणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या दिंडीची परतीचा प्रवास सुरू झाला असून स्वगृही म्हणजेच जिल्ह्यामध्ये आगमन झाले आहे. या पालखीसोबत ७०० वारकरी आहेत. वारकऱ्यांमध्ये शिस्तीचे दर्शन घडते. सर्व दिंडीची सुरक्षितता पोलिस विभाग तसेच ''श्री'' संस्थानच्या सुरक्षा रक्षकाकडून करण्यात येते.
''श्री''च्या पालखी सोहळ्याचा पायदळ प्रवास शेगाव ते श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत ७५० किलोमीटर आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगाव पर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमिटर आहे. असा एकूण प्रवास १३०० किलोमीटरचा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.