Sindkhed Raja News : शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन! थकबाकीदार व दुष्काळग्रस्त शेतकरी विकणे आहे

पीककर्ज थकबाकीदार व दुष्काळ परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांने आता स्वतःला विकायला काढले आहे.
Agitation
Agitationsakal
Updated on

सिंदखेड राजा - पीककर्ज थकबाकीदार व दुष्काळ परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांने आता स्वतःला विकायला काढले आहे. शासन शेतकऱ्यांच्या समस्येप्रती उदासिन आहे, असा आरोप करुन शेतकरी विकणे आहे असे फलक हातात घेऊन तालुक्यातील शेतकरी तहसिल कार्यालाय आज (ता,15) रोजी आंदोलन केले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांना तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्या मार्फत निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दिवसेंदिवस शेती व्यवसाय अनिश्चित होत असून शासनाच्या विविध आश्व्सानावर विश्वास ठेऊन शेतकरी विविध अडचणीचा सामना करत आहे.

आत्मसन्मानाच्या जोरावर आजपर्यंत नेहमी तोट्यात जाणारा शेती व्यवसाय केला परंतु २०१४ पासून सतत नैसर्गिक आपत्ती व शासनाच्या आश्वसनावर हा व्यवसाय केला जात नाही. जवळची सर्वे जमापुंजी संपली असून आता आमचेकडे बँकेकडे गहाण असलेला सातबारा आहे. या वर्षी तालुक्यात भीषण कोरडा दुष्काळ पडला तयामुळे संपुर्ण खरीप हंगाम कोरडा गेला हवामानाच्या भरवश्यावर कुठंमुठं रब्बीची पेरणी केली.

परंतु अतिवृष्टी गारपीट चक्रीवादळ मुले होत्याचे नव्हते झाले स्वप्नावर पाणी फेरले गेले शासनाने आश्वसन दिली. परंतु मदत मिळाली नाही. यासाठी वारंवार निवेदन, आंदोलन, मोर्चे काढले. काही उपयोग झाला नाही. त्यामुळे या पुढे संसार गाडा हाकण्यासाठी आम्हाला स्वतःला विक्री केल्याशिवाय पर्याय नाही, तरी आमची समस्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडून मागणीचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.

कैलास मेहेत्रे, कौतुक ठाकरे, प्रल्हाद मेहेत्रे, भगवान तायडे, गजानन मेहेत्रे, भुजंग जाधव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.